कॉंग्रेस नेते राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत

सन्मानाने दिलेले निमंत्रण नाकारले

कॉंग्रेस नेते राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत

प्रभू राम जन्मभूमी येथे बांधण्यात आलेल्या श्री राम मंदिरात प्रभू श्री रामलला यांची प्राणप्रतिष्ठा सोमवार, २२ जानेवारी रोजी होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अत्यंत सन्मानाने निमंत्रण देऊनसुद्धा आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कॉंग्रेसने हे निमंत्रण नाकारले आहे. याबद्दलची माहिती कॉंग्रेसचे खासदार आणि महासचिव जयराम रमेश यांनी समाजमाध्यमात दिली आहे.

मागील महिन्यातच कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, कॉंग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांना प्रभू श्री राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आले होते. या पवित्र आणि महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय कॉंग्रेसच्या नेत्यांनी घेतला आहे. न जाण्यामागे त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि रा. स्व. संघाने आयोध्या मंदिर हा राजकारणाचा विषय बनवला आहे, अशी टीका कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा..
ठाकरेंना दणका; शिवसेना शिंदेंचीचं, १६ आमदार पात्र!

निवडणूक संचालन समितीच्या समन्वयकपदी आ. अतुल भातखळकर

भारतातील सर्वात वयोवृद्ध सरिस्काची वाघीण ‘राजमाताचा’ मृत्यू!

अखिलेश यादव यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्या भुताने पछाडले!

प्रभू राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भारत वर्षात एक आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना कॉंग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला आहे. वास्तविक राम मंदिर न्यास यांच्या वतीने हे निमंत्रण देशभरातील मान्यवरांना पाठवण्यात आले आहे. या निमंत्रण पाठवण्याच्या विषयात कुठेही भारतीय जनता पक्ष किंवा रा. स्व. संघाचा संबंध नाही. तरीही कॉंग्रेसकडून सन्मानाने दिलेले निमंत्रण नाकारण्यात आले आहे.

Exit mobile version