काँग्रेस नेते सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी झालेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडीपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. घोटाळ्याप्रकरणी झालेल्या ५ वर्षीय शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली. त्यामुळे सुनील केदार यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. जर न्यायालयाने त्यांची याचिका मान्य केली आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला तर त्यांना पुन्हा त्यांची आमदारकी परत मिळेल. याशिवाय येणारी विधानसभा निवडणूकही त्यांना लढवता येईल. यासाठी सुनील केदार यांचे प्रयत्न सुरु आहेत.
हे ही वाचा:
‘डार्कनेटमधून फुटली होती यूजीसी-नेटची प्रश्नपत्रिका’
राजभवनात सध्याच्या कोलकाता पोलिसांच्या ताफ्यात मी सुरक्षित नाही!
अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी!
जगभरातील सर्वांत उंच पुलावरून धावली रेल्वे!
मात्र, सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती मिळू नये यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. या प्रकरणात आता स्वतः राज्याचे महाधिवक्ता विरेंद सराफ हे सरकारची बाजू मांडणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २४ जूनला होणार आहे.