काँग्रेस नेता म्हणतो, आम्ही मोदींच्या पाठीशी, काश्मिरी जनता तिरंगा कधी हाती घेणार!

पहलगाम हिंदू हत्येसंदर्भात व्यक्त केली प्रतिक्रिया

काँग्रेस नेता म्हणतो, आम्ही मोदींच्या पाठीशी, काश्मिरी जनता तिरंगा कधी हाती घेणार!

एकीकडे पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर हल्ला करून त्यांची हत्या केल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. मात्र भारतातील काही लोक यावरून राजकारण करत मोदी सरकारवर फक्त टीका करत आहेत. पण काँग्रेसचे उत्तराखंडमधील नेते सुमित हृदयेश यांनी मोदी सरकारच्या पाठीशी असल्याचे सांगत या घटनेसंदर्भात काश्मिरी जनता मात्र दुटप्पी भूमिका घेत असल्याचे परखड मत व्यक्त केले आहे.

त्यांना या घटनेबाबत विचारले तेव्हा ते पत्रकारांना म्हणाले की, मला इतका राग आला आहे की, यांची हिंमत कशी झाली? डोळ्यांत अश्रु आले. मी जेव्हा ते व्हीडिओ पाहिले तेव्हा मला रडू कोसळले. त्यांची नावे विचारून त्यांना गोळी मारण्यात आली. मला याचे दु:ख झाले. मी काँग्रेसचा आहे हे ठीक आहे. पण ते दहशतवादी म्हणाले की, मोदींना जाऊन सांगा. मोदी हे आमचे पंतप्रधान आहेत. मी त्यांच्या पाठीशी आहे. भारत सरकार जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी मी आहे. या लोकांना असा धडा शिकवला पाहिजे की, जीवनभर त्यांना त्याचे स्मरण राहील. असे कृत्य करण्याची ते पुन्हा हिंमत करणार नाहीत असा हा ध़डा त्यांना शिकविला गेला पाहिजे.

हृदयेश म्हणाले की, काश्मिरी लोकांना मी सांगू इच्छितो की, मी अनेकवेळा काश्मीरला गेलो आहे. तुमची फुटिरतावादाची भूमिका ठेवा बाजुला. तुम्हाला शरम आली नाही. कँडल लाइट रॅली काढता पण त्यात भारताचा एकही झेंडा नसतो. तुम्हाला फक्त भारताशी व्यवहार, व्यापार हवा आहे. या घटनेमुळे तो व्यापार बंद होईल, त्यामुळे तुम्ही दुःखी आहात. तुमचे उत्पन्न पर्यटनामुळे मिळते आहे म्हणून तुम्ही कँडल लाइट मार्च काढलात, पण त्यात भारतीय तिरंगा नव्हता. हे जे काही चालले आहे ते आपल्याला निर्णायक वळणावर घेऊन जाईल. जनतेने मोदींना पंतप्रधान केले आहे. मी त्यांच्यापाठीशी आहे, लष्कराच्या पाठीशी आहोत.

हे ही वाचा:

ईराणच्या बंदरावर भीषण स्फोट

‘केसरी चॅप्टर २’ ची प्रशंसा करताना शशी थरूर यांची टिप्पणी काय ?

पहलगाम हल्ला : काँग्रेसचे नेते राशिद अल्वी म्हणतात हा फाळणीचा परिणाम

पहलगाम हल्ला : अभिनेता अर्जुन बिजलानीने काय घेतला निर्णय?

 

हृदयेश म्हणाले की, काश्मिरी लोकांना समजले पाहिजे की कँडल मार्च काढून होत नाही. हिंदुस्थानी बना, देशासोबत आहात की नाही हे सांगा. खूप झाली सहानुभूती. त्यांना ही गोष्ट समजत नाही. त्यांचे पोट आमच्यामुळे भरते. भारताचा ध्वज केव्हा उचलाल हातात. तेव्हाच खरे हिंदुस्थानी ठराल.

Exit mobile version