मुंबई शहरामध्ये सर्रासपणे गुटखा विक्री होत असून गुटख्याच्या सेवनाने नागरिकांना विविध आजरांशी सामना करावा लागत आहे.मुंबईमध्ये गुटखा विक्री बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे.गुटखा विक्री करणारा आणि खरेदी करणारा या दोघांवर कायदेशीर कारवाई करत मुंबई शहर गुटखा मुक्त करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना याबाबत पत्र लिहिले आहे.मुंबई शहर गुटखा मुक्त करावी अशी मागणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.राजेश शर्मा यांनी पत्रात लिहिले की, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, मुंबईमध्ये गुटखा विक्रीवर बंदी आहे.
हे ही वाचा:
तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती
“वायनाडमध्ये राहुल गांधी भाजपा विरोधात लढण्याऐवजी ‘इंडी’ आघाडीच्या घटक पक्षाशी लढतायत”
ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा सुरू राहणार!
मयंक यादवचे जगभरातून होतेय कौतुक
मात्र, असे असतानाही सर्वत्र राजरोसपणे कुठल्या भीतीशिवाय पथ विक्रेते गुटखा विक्री करीत आहे. प्रामुख्याने रुग्णालय, शाळा, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजारपेठ अशा वर्दळीच्या ठिकाणी सर्रासपणेगुटखा विक्री होत आहे. गुटख्यामुळे सर्वसामान्य जनतेला, कॅन्सर, पाचन समस्या इत्यादी दुर्धर आजरांना सामोरे जावे लागते. गुटख्यांमुळे कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, परिणामी त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकटे ओढवली आहेत.
पोलीस आयुक्त म्हणून आपण गुटखा विक्री विरुद्ध कठोर निर्णय घेवून गुटखा खरेदी करणारा आणि विक्री करणारा अशा दोघांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच मुंबईमध्ये गुटखा इतक्या मोठ्या प्रमाणावर कुठून येतो याचाही तपास करून संबंधितांवर कार्यवाही करावी आणि मुंबई शहर गुटखा मुक्त करावे, ही विनंती.