मुंबईबाहेरच्या रुग्णांना दुप्पट शुल्क हा अन्याय

माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी केली टीका

मुंबईबाहेरच्या रुग्णांना दुप्पट शुल्क हा अन्याय

मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये मुंबईच्या बाहेरून किंवा राज्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी दुप्पट शुल्क आकारण्याचा विचार मुंबई महानगरपालिका करत आहे, असा दावा करत काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी टीका केली आहे.

सातत्याने मुंबईतील रुग्णालये, तसेच रुग्णांच्या व्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करणारे राजेश शर्मा यांनी एक्सवर आपली ही खंत व्यक्त केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, अशाप्रकारचा निर्णय जर मुंबई महानगरपालिका घेत असेल तर त्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा मोठा फटका बसू शकतो आणि दर्जेदार आरोग्यव्यवस्था वापरण्याच्या त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाऊ शकते.

हे ही वाचा:

अडवाणी हे देशाचे लोहपुरुष

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार डीपफेक व्हिडीओची शिकार

राममंदिराबाबत बीबीसीने केलेल्या पक्षपाती वार्तांकनावर ब्रिटिश खासदाराचा संताप

संजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत

राजेश शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक इक्बालसिंह चहल यांना विनंती करून यात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे रुग्णांना मनस्ताप होत असेल तर ते पक्षपातीपणाचे आणि अनैतिक आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

राजेश शर्मा यांनी वारंवार मुंबईतील रुग्णालयांच्या अवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अंधेरी येथील ईएसआयसी रुग्णालयातील डॉक्टरांची सरसकट बदली केल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी आवाज उठविला होता. या रुग्णालयाला काही काळापूर्वी आग लागली होती पण जेव्हा ते सुरू झाले तेव्हा सगळ्या सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा होती मात्र त्या उपलब्ध करून न दिल्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती.

Exit mobile version