25 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषगोळवलकर गुरुजींबाबतचे ट्विट दिग्विजय यांना पडणार महागात

गोळवलकर गुरुजींबाबतचे ट्विट दिग्विजय यांना पडणार महागात

ट्वीटनंतर गुन्हा दाखल

Google News Follow

Related

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे वादग्रस्त आणि बिनबुडाची विधान करण्यात आघाडीवर असतात. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासंदर्भात गरळ ओकणे ही त्यांची ओळख बनून गेली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्याबाबत केलेले ट्वीट त्यांना महागात पडेल, असे दिसते आहे. त्यांच्या विरोधात द्वेष पसरवल्याच्या आरोपाप्रकरणी इंदौर शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडियावर एक छायाचित्र पोस्ट करून ‘गुरू गोळवलकर यांचे दलित आणि मुस्लिमांबाबत तसेच, राष्ट्रीय जल जंगल व जमीन अधिकाराबाबत काय विचार होते, हे अवश्य वाचा,’ असे लिहिले आहे.

या छायाचित्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी त्यांचे पुस्तक ‘वी अँड अवर नेशनहूड आयडेन्टिफाइड’ यात म्हणातात असा दावा करण्यात आला आहे. जेव्हा केव्हा सत्ता हातात येईल, तेव्हा सरकारची धनसंपत्ती, राज्यांची जमीन आणि जंगल आपल्या दोन-तीन विश्वासार्ह धनाढ्य व्यक्तींकडे सोपवा. ९५ टक्के लोकांना भिकारी बनवा, म्हणजे सात जन्मांपर्यंत सत्ता हातातून जाणार नाही.’ असे गोळवलकर गुरुजी यांनी म्हटल्याचा दावा केला आहे. या पुस्तकात गोळवलकर गुरुजी यांना कोट करून त्यांनी १९४० मध्ये केलेले वाक्यही उद्धृत केले आहे. ‘मी माझे संपूर्ण आयुष्य इंग्रजांची गुलामी करण्यास तयार आहे. मात्र जे सरकार दलित, मागास आणि मुसलमानांना बरोबरीचा अधिकार देते, तसे सरकार मला नको,’ असे त्यांनी म्हटल्याचा दावा केला आहे.

हे ही वाचा:

प. बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा; पंचायत निवडणुकीत १८ ठार

मॅट्रिमोनिअल साइटवर झाली ओळख, बसला ९२ लाखांचा फटका!

भारतीय लष्कराने चीनला दाखवली चिलखती ताकद !

गावकऱ्यांचे भाग्यच उजळले; मिळाले प्रत्येकाला तब्बल ५८ लाख

दिग्विजय सिंह यांनी केलेल्या ट्वीटनंतर एका तक्रारदाराने सिंह यांच्यावर समाजात द्वेष पसरवण्याचा आरोप केला आहे. सिंह यांनी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला नाही तर, त्यांच्या भावनाही दुखावल्या आहेत, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

गोळवलकर गुरुजी म्हणजेच माधवराव सदाशिवराव गोळवलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९०६रोजी रामटेक येथे झाला होता. बनारसमध्ये झालेल्या डॉ. हेडगेवार यांच्या कार्यक्रमादरम्यान त्यांची ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी झाली. ते तेव्हा डॉ. हेडगेवार यांच्या विचारांनी खूप प्रभावित झाले होते. डॉ. हेडगेवार यांची प्रकृती ढासळू लागल्याने १३ ऑगस्ट, १९३९ रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी गोळवलकर यांची ‘सरकार्यवाहक’ पदावर नियुक्ती केली होती. १९४० ते १९७३ अशी तब्बल ३३ वर्षे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार केला. ५ जून, १९७३ रोजी गोळवलकर यांचा मृत्यू झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा