काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य काँग्रेस नेते आशीष देशमुख यांच्या अंगलट आले असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं, “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने ५ मार्च २०२३ रोजीच्या पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसला ९ एप्रिल २०२३ रोजीच्या आपल्यामार्फत मिळालेल्या उत्तरावर समितीने चर्चा केली आहे. आपण आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही.
त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात.”पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय देताना म्हणाले की ,“आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे”. “या आदेशाद्वारे पक्षविरोधी कारवायांमुळे आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन पुढील सहा वर्षाकरिता तात्काळ निष्कासित करण्यात येत आहे,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.
हे ही वाचा:
निवडणूक लढवल्याबद्दल १० वर्षांपूर्वी नोकरीवरून काढलेल्या परिचारिकेला दिलासा
परस्पर विश्वास, आदर हे भारत-ऑस्ट्रेलिया दृढ संबंधांचे सूत्र
लोकसभेच्या जागावाटपातही सूडाचा निकष…
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीस म्हणाले, मोदी म्हणजे ‘द बॉस’
ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येणार देशमुख यांचं वक्तव्य
महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यावर काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख म्हणाले, ४८ जागेचे वाटपाची यादी आज पाहायला मिळाली, येणाऱ्या काळात शिंदे गटाची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना काही दिवसात एकत्रित होऊन दोन्ही गट भाजपा सोबत जातील. महाविकास आघाडीसोबत तिन्ही पक्ष एकत्रित राहणार नाहीत. विधानसभा अध्यक्षांकडे ५४ आमदारांवर अँटीडीफेक्शनच्या केसेस प्रतिस्पर्धी गटाने टाकले असल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी जो एकमेव मार्ग आहे तो म्हणजे , जर दोन्ही शिवसेना जर एकत्रित झाल्या ,तर ह्या सदस्यांच विधानसभेतील सदस्यत्वपद वाचू शकेल. हे माझे वैयक्तिक मत आहे असेही देशमुख म्हणाले होते.