छत्तीसगडमध्ये महिला काँग्रेस नेत्यांने केले हिंदुराष्ट्रासाठी आवाहन

आपण कुठेही असलो तरी हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची शपथ घेतली पाहिजे, असे केले आवाहन

छत्तीसगडमध्ये महिला काँग्रेस नेत्यांने केले हिंदुराष्ट्रासाठी आवाहन

छत्तीसगड काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार अनिता शर्मा यांनी शुक्रवारी हिंदु राष्ट्राच्या उभारणीसाठी एकतेचे आवाहन केले आणि प्रत्येकाने यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. “आपण सर्वांनी, मग आपण कुठेही असलो तरी हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची शपथ घेतली पाहिजे. आपण हिंदूंसाठी बोलले पाहिजे, जे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सर्व हिंदू एकत्र उभे राहतील,” असे श्रीमती शर्मा यांनी सांगितले.

हे ही वाचा:

आंतरराष्ट्रीय ‘योग दिनानिमित्त’ भाजपातर्फे राज्यभर विशेष कार्यक्रमांचा धडाका !

काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

साक्षी मलिक ही काँग्रेसच्या हातातील बाहुले! कुस्तीगीरांमध्ये जुंपली

बिहारमध्ये उष्माघाताने २४ तासांत ३५ जणांचा मृत्यू

त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाने या विधानाला ‘वैयक्तिक मत’ म्हणत या विधानापासून स्वतःला दूर केले. तथापि, नंतर शर्मा यांनी सारवासारव करत स्पष्ट केले की त्यांचे विधान विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने मांडले आहे. “देशात विविध धर्माचे लोक एकोप्याने राहतात आणि आम्हाला कोणाला तोडायचे नाही. आमचे नेते राहुल गांधी लोकांना एकत्र करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढत आहेत कारण भाजपचे काही लोक समाजात फूट पाडण्यात गुंतले आहेत, असेही त्या म्हणाल्या.

Exit mobile version