23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'दहशतवादी कसाबची बाजू घेऊन काँग्रेसकडून शहिदांचा अपमान'

‘दहशतवादी कसाबची बाजू घेऊन काँग्रेसकडून शहिदांचा अपमान’

पंतप्रधान मोदींचा अहमदनगरमधून कॉग्रेस, इंडी आघाडीवर घणाघात

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज अहमदनगरमध्ये सभा पार पडली.अहमदनगर मधून भाजपचे उमेदवार डॉ.सुजय राधाकृष्ण विखेपाटील आणि शिर्डी मधून एनडीएचे उमेदवार शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराकरिता आज पंतप्रधान मोदींनी अहमदनगरमध्ये सभा घेतली.सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.ते म्हणाले की, इंडी आघाडीचे सरकार आल्यानंतर संपूर्ण आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा त्यांचा मनसुबा आहे.२६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू काँग्रेस घेत आहे.शहिदांचा हा अपमान आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांना माझा प्रमाण.तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज सुरु आहेत.भाजप आणि एनडीएला भरपूर प्रमाणात जनसमर्थन मिळत आहे.तिसऱ्या टप्प्याचा प्रतिसाद पाहून ४ जून रोजी इंडी आघाडीची एक्सपायरी डेट ठरली हे स्पष्ट होते.

ते पुढे म्हणाले, ४ जून नंतर इंडी आघाडीचा झेंडा उचलायला देखील कोणी मिळणार नाही.ही निवडणूक संतुष्टीकरण आणि तुष्टीकरन यांच्यामध्ये होत आहे.देशवासियांना संतुष्ट करण्यासाठी भाजप आणि एनडीएचा प्रयत्न आहे.तर दुसरीकडे इंडी आघाडीवाले तुष्टीकरणासाठी गुंतले आहेत.काँग्रेसचा संपूर्ण जाहीरनामा मुस्लिम लीगवर आधारित आहे.भाजप आणि एनडीएचे मुद्दे म्हणजे , विकास, गरिब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, सन्मान आहेत.तर दुसरीकडे काँग्रेस आहे जो या मुद्यावर बोलण्याच्या स्थितीत नाहीये.गरिबीची भाषा केली तर काँग्रेस शहामृह सारखा वाळवंटात जाऊन मान खाली घालून बसतो.५० वर्षे त्यांनी गरिबीची भाषा केली मात्र, काहीच केलं नाही.आम्ही विकासाची भाषा करतो आणि काँग्रेस तोंडावर पट्टि बांधून शांत बसेल.

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू यादव यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांचे मित्र मोठा भयानक खेळ खेळण्यात गुंतले आहेत.या प्लॅनची भाषा करताना एका बड्या नेत्याने नकाब उतरवला आहे.इंडी आघाडीचे सर्वात मोठे पार्टनर (लालू यादव) जे आताच जेलमधून बाहेर आले आहेत.कोर्टाने त्यांना शिक्षा दिली आहे. चारा घोटाळ्यात ज्याला दोषी करार दिला आहे.त्याने आज मीडिया समोर सांगितले की, इंडी आघाडीचे सरकार आले तर देशात मुसलमानांना आरक्षण देऊ.संपूर्ण आरक्षण देऊ, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

पालघर: खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश!

सलमान खान गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी राजस्थानमधून गजाआड

कसाबचे कौतुक करायचे असेल तर पाकिस्तानात जा!

‘लडकी हो तो पिटोगी, ही काँग्रेसची घोषणा’

ते पुढे म्हणाले, संपूर्ण आरक्षण म्हणजे , जे आता एससी, एसटी, ओबीसी, सामान्य गरीब लोकांकडे आहे ते.त्यामुळे त्यांचे असे म्हणणे आहे की, हे संपूर्ण आरक्षण काढून मुसलमानांना द्यायचे.वोटबँकला पक्के करण्यासाठी ते हे करत आहेत.हे पाप काँग्रेस आणि इंडी आघाडीवाले करण्याचा प्रयत्न करत आहेत.इंडी आघाडीवाले संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, याठिकाणी काँग्रेसचे काहीच चालत नाहीये.त्यांची एक टीम फेल पडल्यामुळे दुसरी टीम, जी सीमेपलीकडे आहे ती एक्टिव झाली आहे.काँगेसची हिंमत वाढवण्याची सीमेपलीकडून ट्विट केले जात आहे.याच्या बदल्यात काँग्रेस पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यात क्लीन चिट देत आहे.

पंतप्रधान मोदींनी जनतेला विचारले की, तुम्ही सांगा २६/ ११ चा मुंबईमध्ये हल्ला झाला, आमच्या जवानांना शहीद केलं, निर्दोष लोकांची हत्या झाली हे सर्व कोणी केली?, यावर जनतेचा एकच आवाज आला पाकिस्तान..पाकिस्तान…ते पुढे म्हणाले की, तुम्हाला, संपूर्ण देशाला हे सर्व माहित आहे, कोर्टाने देखील यावर निकाल दिला आहे.विशेष म्हणजे पाकिस्तानने देखील हे सर्व स्वीकार केलं आहे.मात्र, काँग्रेसचा एका नेता अजमल कसाबची बाजू घेत आहे.या दुर्घटनेत मृत पावलेल्यांचा हा अपमान आहे.शहिदांचा अपमान आहे.तुष्टीकरणासाठी काँग्रेस अधिकच खाली उतरत चालली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा