संसदेत काँग्रेस अन रस्त्यावर मुस्लीम; वक्फ दुरुस्ती विधेयक रोखण्याचे प्रयत्न सुरू!

वक्फ विधेयकाविरोधात जयपूरमध्ये पार पडली बैठक

संसदेत काँग्रेस अन रस्त्यावर मुस्लीम; वक्फ दुरुस्ती विधेयक रोखण्याचे प्रयत्न सुरू!

वक्फ दुरुस्ती विधेयक कायदा रोखण्यासाठी काँग्रेस रस्त्यापासून ते संसदेपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कारण काँग्रेसचे नेते रस्त्यावर गर्दी जमवून द्वेषपूर्ण विधाने करणाऱ्या मौलानांसोबत बसत आहेत आणि हे स्पष्ट दिसून येत आहे. हे मौलाना लोकांना भडकावण्याचे काम करत आहेत. तसेच काँग्रेसचे खासदार संयुक्त संसदीय समितीमध्ये (जेपीसी) विधेयक पुढे जाऊ देत नाहीत.

या मालिकेत सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी राजस्थानमधील जयपूरमध्ये मुस्लिमांची मोठी गर्दी जमवली होती. रविवारी (१० नोव्हेंबर) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुस्लिमांना वक्फ विधेयकावरून भीती घालण्यात आली. द्वेषपूर्ण वक्तव्ये करणाऱ्या मौलाना तौकीर रझाला देखील या बैठकीला बोलावण्यात आले होते.

हे ही वाचा :

विक्रांत मॅसी हिंदुत्वाच्या बाजूने बोलला, मात्र हे चित्रपट प्रमोशनसाठी असल्याची टीका

युक्रेनमधील युद्ध वाढवू नका

हिजबुल्लाच्या पेजर स्फोटामागे इस्रायलचं; नेतन्याहू यांची कबुली

संजीव खन्ना भारताचे ५१ वे सरन्यायाधीश

काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी हा मुस्लिमांवरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले. इम्रान मसूद यांनी जयपूरमध्ये सांगितले की, हे आम्हाला मान्य नाही. लोकांमध्ये संताप आहे. (वक्फ) विधेयक संविधानाच्या कलम १४ ,२५ ,२६ आणि ३० चे उल्लंघन करते. हा केवळ मुस्लिमांवरच नाही तर संविधानावरही हल्ला आहे,” असे काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी म्हटले. विशेष म्हणजे, इम्रान मसूद हे वक्फ विधेयकावरील जेपीसीचे सदस्य आहेत. जेपीसीमध्ये ते या विधेयकाला सातत्याने विरोध करत आहेत.

 

Exit mobile version