पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१७ सप्टेंबर) ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये भारताची महत्वाकांक्षी सुभद्रा योजनेचे उद्घाटन केले. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरवर्षी १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन श्री गणेशाच्या केलेल्या पूजेवर भाष्य केले. सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत म्हणाले, सत्तेसाठी भुकेलेल्यांना गणेश पूजेची समस्या होती. मी गणेश पूजेत सहभागी झालो म्हणून काँग्रेसचे लोक आणि त्यांची इकोसिस्टम खवळली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, गणेशोत्सव हा आपल्या देशासाठी केवळ श्रद्धेचा उत्सव नाही, तर आपल्या स्वातंत्र्य चळवळीत त्याची महत्वाची भूमिका आहे. त्याकाळीही फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबणारे इंग्रज गणेशोत्सवाचा द्वेष करत असत. आजही समाजात फूट पाडू पाहणाऱ्यांना गणेश उत्सवाची समस्या आहे, सत्तेच्या भुकेल्यांना गणेशपूजनाचा त्रास होत आहे. हे तुम्ही पाहिले असेलच, मी गणेश पूजेत भाग घेतल्याने काँग्रेसचे लोक आणि त्यांची इकोसिस्टम कशी खवळली आहे.
हे ही वाचा :
आतिशी यांचे आई-वडील आतंकवादी अफझल गुरूची फाशी रोखण्यासाठी लढले !
बांगलादेशातील अस्थिरतेच्या काळात हिंदूंना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो
लखनौमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षकालाच पळवून नेले!
जिओचे नेटवर्क गायब; सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या तक्रारी
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात गणेश मूर्तीला पोलीस व्हॅनमध्ये टाकलेल्या कर्नाटकाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, कर्नाटकात काँग्रेस सरकारने गणेशाची मूर्ती तुरुंगात टाकली. अशी द्वेषपूर्ण विचारसरणी आणि समाजात विष कालवण्याची मानसिकता देशासाठी घातक आहे. अशा शक्तींना पुढे जाऊ न दिले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.