राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या चर्चेत भाग घेताना केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी दावा केला की, काँग्रेसला सीमावर्ती भागात योग्य रस्ते बांधायचे नाहीत कारण त्यांना भीती होती की त्यामुळे सैन्याला जाण्यास मदत होईल.
माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी म्हणाले होते की मी देशाचा संरक्षण असताना आमच्या काँग्रेस सरकारने सीमावर्ती भागात रस्ते बांधले जाऊ नयेत, असे धोरण ठरवले होते. रस्ते बांधले तर चीन त्याच मार्गाने येऊन आमची जमीन ताब्यात घेईल, याचा उल्लेख रिजिजू यांनी केला.
हेही वाचा..
‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचीर बालाजी यांचा अमेरिकेत आढळला मृतदेह
सीरियातून आलेल्या भारतीयांनी मानले मोदी सरकारचे आभार
हवाई दलाला मिळणार आणखी बळ; ताफ्यात दाखल होणार १२ सुखोई विमाने
सोमवारी लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडणार
आपल्या भाषणात बोलतना त्यांनी टीका केली की, भारताने सर्वांना समान मतदानाचा अधिकार दिला आहे, तर काहींचा दावा आहे की अल्पसंख्याकांना देशात कोणतेही अधिकार नाहीत. आमच्या बोलण्याने आणि कृतीने देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर खराब होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
भारत अल्पसंख्याकांना केवळ कायदेशीर संरक्षणच देत नाही, तर त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी कृती करते, असेही रीजीजू म्हणाले. ते म्हणाले, एकापाठोपाठ आलेल्या सरकारांनी अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी काम केले. “काँग्रेसनेही ते केले आहे, त्यांना आपण यात कोठीही कमी केले असे म्हणत नाही.