खर्गेचे G2 आणि गोयल म्हणाले 2G, One G, son G !

खर्गे म्हणतात.. शून्य कमळाने झाकले होते

खर्गेचे G2 आणि गोयल म्हणाले 2G, One G, son G !

कांग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बोलताना G २० शिखर परिषदेला G२ समिट असे म्हणत भाषणाला सुरुवात केली.मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या ६५ मिनिटांच्या भाषणात सांगितले की, देशातील वाढती महागाई, वाढती बेरोजगारीच्या मुद्यांना बाजूला ठेवून आपण फक्त G२ बद्दल बोलत आहोत.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी G२ परिषद म्हटल्याने राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी ते दुरुस्त करून G २० शिखर परिषद असल्याचे सांगितले.त्यावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, शून्य कमळाने झाकलेले असल्याने G२ असे म्हणालो.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षानेही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी २००४-२०१४ दरम्यान काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या अनेक घोटाळ्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.मल्लिकार्जुन खर्गे यांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, “ते फक्त २G, One G आणि Son G पाहण्याचं काम करतात.

हे ही वाचा:

रोहित शर्मा म्हणाला, आशिया कप जिंकला, आता लक्ष विश्वचषकाकडे

सरकार येईल जाईल पण हा देश टिकला पाहिजे !

कोटामध्ये विद्यार्थ्यांचा जीव का घुसमटतोय?

‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?

संसदेचे विशेष अधिवेशन
संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली.संसदेच्या ७५ वर्षांच्या वाटचालीवर आणि सभागृहाचे कामकाज नवीन इमारतीत हलविण्यावर तसेच पाच दिवसांच्या बैठकीदरम्यान सरकार काही आश्चर्यकारक बाबी आणेल की नाही याबद्दल तीव्र चर्चेने बैठकीची सुरवात झाली.

 

Exit mobile version