पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ९ जून रोजी होत असून या सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना मिळाले आहे, अशी माहिती सूत्रांनी शनिवारी इंडिया टुडेला दिली. तथापि, शपथविधी सोहळ्यात सहभागी व्हायचे की नाही, याबाबत ‘इंडिया’ गटाच्या सदस्यांशी चर्चा करून खरगे याबाबतचा निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले.
आदल्या दिवशी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची सर्व आमंत्रणे आंतरराष्ट्रीय नेत्यांना जात आहेत, मात्र काँग्रेसच्या पक्षनेत्यांना कोणतेही आमंत्रण मिळालेले नाही, असे सांगितले होते.
‘शपथ घेणाऱ्या व्यक्तीने आपले वैयक्तिक, राजकीय आणि नैतिक अधिकार गमावले आहेत.
हे ही वाचा:
संगीतकार विशाल दादलानीला सोशल मीडियावर ठोकून काढले!
जम्मू काश्मीरमध्ये आयएसआय, दहशतवाद्यांची कामे करत होते सरकारी कर्मचारी!
‘पवन कल्याण’ ठरले आंध्रच्या निवडणुकीतले वादळ
ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव
त्यांच्या (मोदी) नावाने जनादेश मागितला होता, तो त्यांना मिळाला नाही, आणि शपथविधीचे हे नाटक का केले जात आहे ते आम्हाला समजत नाही,’ असे जुन्या संसदेच्या इमारतीमधील सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर रमेश यांनी म्हटले होते. बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत इंडिया गट निर्णय घेईल, असे सांगितले होते.
राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सव्वासात वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला भारताच्या शेजारील आणि हिंदी महासागर क्षेत्रातील प्रमुख मान्यवर आणि विशेष निमंत्रितांचा समावेश आहे.या शपथविधी सोहळ्याला श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे उपस्थित राहणार आहेत.