आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे इंदूरचे उमेदवार अक्षय कांती बंब यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी बंब यांचा एक फोटो पोस्ट केला असून त्यांचे पक्षात स्वागत असे त्यांनी त्यात म्हटल्यामुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली इंदूरमधील काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अक्षय कांती बम यांचे भाजपमध्ये स्वागत असल्याचे म्हटले आहे.
१३ मे रोजी मतदान होणार असलेल्या इंदूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने भाजपचे विद्यमान खासदार शंकर लालवानी यांच्या विरोधात बंब यांना उमेदवारी दिली होती.
हेही वाचा..
सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले
चेंगा बेंगा सामुहिक बलात्कारप्रकरणी ९ जणांना अटक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ लोकलचा डबा घसरल्याने हार्बर मार्गाची वाहतूक ठप्प
छत्तीसगढमध्ये पुन्हा चकमक, सुकमामध्ये एक नक्षलवादी ठार!
बंब यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेस नेत्या सुभाषिनी शरद यादव म्हणाल्या, त्यांचा भाजप प्रवेश हा भीतीमुळे झाला आहे. निरोगी लोकशाहीसाठी सर्व पक्ष आणि विविध समाजातील लोकांनी सहभाग घेणे महत्त्वाचे आहे. सुरत नंतर इंदूरमध्ये असे घडले असले तरी येथे पक्ष कमकुवत नाही. येथे लोकशाहीची हत्या होत असल्यचे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी बीजेडीचे सोरो आमदार परशुराम धाडा ओडिशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये परतले आहेत. काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. यापूर्वी, २७ एप्रिल रोजी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने शीखांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
अल्पसंख्याक समुदायाच्या मदतीसाठी सरकारने केलेल्या अनेक उपायांचा उल्लेख करून, भाजपचे प्रमुख जे. पी. नड्डा यांनी या प्रसंगी सांगितले की जर कोणी खरोखर समाजासाठी काम केले असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे की एक हजार पेक्षा अधिक शीख भाजपमध्ये सामील झाले आहेत.