मध्य प्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मागे टाकत भाजपने मुसंडी मारली.एकीकडे भाजप विजयाचा जल्लोष साजरा करत आहे तर दुसरीकडे काँग्रेस बैठकीचे आयोजन करण्यात गुंतला आहे.काँग्रेसने नवी दिल्लीत ६ डिसेंबर रोजी सकाळी भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (इंडी आघाडी)ची बैठक बोलावली आहे.
पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आयएनसी), द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) आणि तृणमूल काँग्रेससह आघाडीच्या भागीदारांशी संपर्क करून बैठकीची माहिती दिली.राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी ही बैठक होणार आहे. ३ डिसेंबरच्या निकालानंतर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगानं ही बैठक होणार असल्याचे सांगितलं जात आहे.
इंडी आघाडी ही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोठ्या राजकीय पक्षांची युती आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) सामना करण्यासाठी इंडी आघाडीची स्थापना करण्यात आली होती.जुलै २०२३ मध्ये बेंगळुरू येथे विरोधी पक्षाच्या बैठकीत इंडी आघाडीची स्थापना करण्यात आली होती.
हे ही वाचा:
कर्करोगग्रस्त अभिनेता ज्युनियर मेहमूदची जॉन लिव्हरने घेतली भेट
बुद्धिबळ स्टार प्रज्ञानंद आणि वैशालीने केली कमाल!
मुंबई विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात उलगडला सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास
एक अकेला, सब पर भारी’ स्मृती इराणीकडून ट्विट!
शेवटची विरोधी बैठक शिवसेना (उबाठा) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आयोजित केली होती.या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पाच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.दोन दिवसांच्या चर्चेमध्ये युतीने आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रमुख निवडणूक मुद्द्यांवर चर्चा केली.तसेच समन्वय समिती तयार करत२०२४ च्या काळातील निवडणूका इंडी आघाडीतील सर्व पक्ष एकत्र लढतील असा ठराव मंजूर केला.
दरम्यान, मध्य प्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगडमधील लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजपला बहुमत मिळाले आहे.मात्र, तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे.भाजपच्या तीन राज्यातील यशामुळे काँग्रेसने धसका घेऊन ६ डिसेंबर रोजी इंडी आघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असावे असे बोलले जात आहे.