काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सोमवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला ‘राजकीय पर्यटन’ म्हणत टीका केली. आचार्य कृष्णम म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इतर पक्ष तयारी करत असताना काँग्रेसचा मात्र प्रवास सुरु आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी बिहारमध्ये किशनगंज मार्गे मुस्लीमबहुल भागात आणि पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पुन्हा सामील झाल्यानंतर हा दौरा होत आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, काँग्रेस २०२४ च्या निवडणुकीसाठी नाही तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहे. काँग्रेस पक्षाकडे काही महान आणि हुशार नेते आहेत. एकीकडे सर्व राजकीय पक्ष २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, तर दुसरीकडे संपूर्ण काँग्रेस पक्ष राजकीय पर्यटन करत आहे. ही तर २०२९ च्या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत, असे दिसते.
हेही वाचा..
‘मम्मी, पापा, मी जेईई पास होऊ शकत नाही, राजस्थान येथील १८ वर्षीय मुलीची आत्महत्या!
पंतप्रधानांच्या परीक्षे पे चर्चा कार्यक्रमात २ कोटी विद्यार्थांचा सहभाग
लोकसभेपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख ठरली!
भगव्या झेंड्यावरुन कर्नाटकात काँग्रेस-भाजप आमनेसामने!
कृष्णम हे काँग्रेसच्या हिंदुविरोधी विचारांवर टीका करत आहेत. डिसेंबरमध्ये, जेव्हा छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, तेव्हा नेत्याने नमूद केले की ही संख्या हिंदू धर्माच्या विरोधाचा आणि पक्षाच्या हिंदुविरोधी मानसिकतेचा परिणाम आहे. तसेच, नुकताच अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तेव्हा कृष्णम यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि त्यांच्या नेतृत्वाशिवाय राम मंदिर शक्य झाले नसते असे सांगितले. या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा काँग्रेसचा निर्णयही त्यांनी दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.