आरक्षणावरून काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर निशाणा साधत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी दोन्ही पक्षांना ‘आरक्षणविरोधी’ म्हटले आहे. त्यांच्यासोबत भविष्यात कोणतीही युती होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये मायावती म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हे काँग्रेस पक्षाला कधीही माफ करणार नाहीत. कारण काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न केले नाही. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला चालना देणारे कांशीराम जी यांचे निधन झाले, तेव्हा या काँग्रेसने केंद्रात सरकार होते. त्यांच्या सन्मानार्थ एक दिवसाचा राष्ट्रीय शोकही काँग्रेसने जाहीर केला नाही.
हेही वाचा..
इस्रायल, हिजाबुल्ला आमनेसामने; एकमेकांवर डागली रॉकेट्स
महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणावरील हिंदुत्ववाद्याची व्यथा!
‘किसान एक्सप्रेस’चे डबे झाले वेगळे; ८ डबे रेल्वेस्थानकावर तर १३ डबे रुळावर !
बलुचिस्तानमधील बाजारपेठेत बॉम्बस्फोट; दोन मुलांसह महिला ठार
केंद्रात भाजपची सत्ता येण्यापूर्वी काँग्रेसने राष्ट्रीय जात जनगणना का केली नाही आणि आता त्याबद्दल ते बोलत आहेत, असा सवालही मायावती यांनी केला आहे. कोणत्याही निवडणुकीत एससी, एसटी आणि ओबीसी वर्गाच्या या आरक्षण विरोधी पक्षांसोबत सपा आणि काँग्रेस या पक्षांशी युती करणे हिताचे असेल का? असे अजिबात होणार नाही.