इलॉन मस्क यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

भारतात ‘रोमांचक कामाची’ अपेक्षा व्यक्त

इलॉन मस्क यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

अब्जाधीश उद्योगपती आणि इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सत्तेत परतल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांच्या कंपन्या भारतात उत्साहपूर्ण काम करतील, अशी अपेक्षा मस्क यांनी व्यक्त केली.

‘जगातील सर्वात मोठ्या लोकशाही निवडणुकांतील तुमच्या विजयाबद्दल नरेंद्र मोदींचे अभिनंदन! माझ्या कंपन्या भारतात उत्कंठावर्धक काम करतील, अशी आशा आहे,’ असे मस्क यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे. नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानपदी नियुक्ती केली. आता ते रविवारी सलग तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) लोकसभेच्या ५४३ जागांपैकी २९३ जागा जिंकल्या आहेत.

निवडणुकीपूर्वी मस्क यांनी त्यांच्या भारत भेटीची घोषणा केली. तथापि, टेस्लाच्या अत्यंत महत्त्वाच्या कामांमुळे ही भेट पुढे ढकलण्यात आली.

गेल्या वर्षी जूनमध्ये मस्क आणि पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेत चर्चा झाली होती. भेटीनंतर, मस्कने स्वतःला आपण मोदींचा चाहता असल्याचे म्हटले होते आणि टेस्ला भारतात गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी असेही नमूद केले की, पंतप्रधान मोदी यांनी टेस्लाने भारतात महत्त्वाची गुंतवणूक करावी, यासाठी आग्रह धरला असून अशी घोषणा लवकरच अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांच्यावर हल्ला; एकाला अटक

मी चुकलो…निवडणूक अंदाजाबद्दल प्रशांत किशोर यांनी दिली कबुली

मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे… मुख्यमंत्री शिंदेंनी वाचली मोदींसाठी खास कविता

संसदेतील घुसखोरीप्रकरणात हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

‘त्यांना (मोदी) खरोखरच भारताची काळजी आहे कारण ते आम्हाला भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहेत, जे आम्ही करू इच्छितो…मला विश्वास आहे की टेस्ला भारतात असेल आणि शक्य तितक्या लवकर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे सन २०२३च्या बैठकीनंतर मस्क यांनी पत्रकारांना सांगितले होते.

Exit mobile version