दिल्ली वक्फ बोर्डाने वक्फ कायद्यातील बदलांना पाठींबा दिल्यानंतर जेपीसी बैठकीत गोंधळ

विरोधकांनी दिल्ली वक्फ बोर्डाचे प्रशासक मुस्लिम नसल्याचे सांगत केला युक्तिवाद

दिल्ली वक्फ बोर्डाने वक्फ कायद्यातील बदलांना पाठींबा दिल्यानंतर जेपीसी बैठकीत गोंधळ

दिल्ली वक्फ बोर्डाने कायद्यातील प्रस्तावित बदलांना पाठींबा दिल्यानंतर वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत पुन्हा गोंधळ उडाल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. दिल्ली वक्फ बोर्डाचे प्रशासक आयएएस अश्विनी कुमार यांनी विधेयकाचे समर्थन केले तरीही विरोधी खासदारांनी त्यांची भूमिका बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

विरोधकांनी दिल्ली वक्फ बोर्डाचे प्रशासक मुस्लिम नसल्याचे सांगत असा युक्तिवाद केला की कायद्यानुसार गैर-मुस्लिम वक्फ बोर्डावर असू शकत नाहीत. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना त्यांनी दिल्ली वक्फ बोर्डावर हिंदू प्रशासकाची नियुक्ती केली होती, अशी माहिती भाजपाच्या एका खासदाराने दिल्याची माहिती आहे. विरोधकांनी सांगितले की, दिल्ली वक्फ बोर्डाचे प्रशासक दिल्ली सरकारच्या मान्यतेशिवाय त्यांचे सादरीकरण घेऊन आले आहेत. त्यांच्यावर (प्रशासक) फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काही विरोधी खासदारांनी केली आहे. वक्फ बोर्डावरील दिल्ली सरकारच्या प्रतिनिधीलाही संसदीय पॅनेलसमोर सादरीकरण करण्याची परवानगी द्यावी, असे विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले. ही मागणी समितीच्या अध्यक्षांनी मान्य केली आहे.

दिल्ली वक्फ बोर्डाने केलेल्या सादरीकरणाच्या निषेधार्थ सोमवारी विरोधकांनी सभेतून सभात्याग केला. आप खासदार संजय सिंह यांनी म्हटले की, सादरीकरणाची दिल्ली सरकारने तपासणी केली नाही. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या मान्यतेशिवाय वक्फ बोर्डाच्या प्राथमिक अहवालात फेरफार करण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.

हे ही वाचा : 

प्रभू श्रीराम, सावरकरांचा डाव्या संघटनांकडून अपमान, अभाविप कार्यकर्त्यांचा संताप!

बांगलादेशमध्ये छळ झालेल्या हिंदूंच्या न्यायाच्या आशा संपल्या

‘प्रकल्पांना विरोध करायचा, मग ओरड करायची, हेच विरोधकांचे धोरण’

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देऊन आर. आर. पाटलांनी केसाने गळा कापला

वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी देखील उपस्थित होते. ज्यांना गेल्या आठवड्यातील त्यांच्या चुकीच्या वर्तनासाठी एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले होते. भाजपा खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्याशी झालेल्या जोरदार वादानंतर सभेदरम्यान बॅनर्जी यांच्या हाताला काचेच्या पाण्याची बाटली फोडून दुखापत झाली होती.

Exit mobile version