देशमुख हत्येप्रकरणी आरोपींची संपत्ती जप्त होणार!

मुख्यमंत्री फडणवीसांनी सीआयडीला दिले आदेश

देशमुख हत्येप्रकरणी आरोपींची संपत्ती जप्त होणार!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे. बीड हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन मोठे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. हत्येप्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणा सीआयडीला तसे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड प्रकरणातील जे फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. तसेच बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, त्याची खातर जमा करून त्यांचे परवाने जप्त करण्याचे आदेश बीड पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे. तसेच फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना देण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन

जम्मू-काश्मीरमध्ये चमत्कार, मुस्लिम कुटुंबाच्या घरात सापडले शिवलिंग आणि माता वैष्णोदेवीची मूर्ती!

दिल्ली निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर

फ्लॉवर नही फायर है नितीश रेड्डी!

दरम्यान, संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी आज (२८ डिसेंबर) बीड मोठ्या मुक मोर्चा पार पडला. मूक मोर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होते. आरोपींना अटक करून लवकरात-लवकर कडक कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मूक मोर्चाला संभाजीराजे छत्रपती, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, अभिमन्यू पवार, नरेंद्र पाटील, ज्योती मेटकर आणि दीपक केदार आदी नेते उपस्थित होते.

Exit mobile version