24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषआरोग्य विभागातील भरतीप्रक्रिया पारदर्शक हवी

आरोग्य विभागातील भरतीप्रक्रिया पारदर्शक हवी

सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

Google News Follow

Related

राज्य शासनाच्या ७५ हजार पदभरती धोरणांतर्गत आरोग्य विभागातील सुमारे ११ हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया सुरू आहे. ही भरतीप्रक्रिया सुरळीत, पारदर्शी व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले. आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

हेही वाचा..

वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुक्त विद्यापीठाने पुढाकार घ्यावा

डिजिटल इंडियाचे ऑगस्टमध्ये युपीआयद्वारे १ हजार कोटींपेक्षा जास्त व्यवहार!

लांडगा आला रे आला मुंबई तोडली रे तोडली!

चांद्रयान- ३ पेक्षाही कमी खर्चात आदित्य L1 सूर्याकडे पोहचणार

आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, आरोग्य विभागाची ही भरतीप्रक्रिया सर्वात मोठी आहे. त्यामुळे अत्यंत सुरक्षितपणे भरतीप्रक्रिया राबवावी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मागील परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा अनुभव आहे. त्यामुळे कुठलाही गैरप्रकार या परीक्षेत व्हायला नको. परीक्षेसाठी १० ते ११ लाख अर्ज येण्याचे लक्षात घेत सर्वरची क्षमता ठेवावी. सर्वर डाऊनमुळे अर्ज न स्वीकारणे, परीक्षा न देता येणे आदी प्रकार होऊ नयेत, यासाठी कंपनीने आत्ताच नियोजन करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या.

बैठकीला अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सहसचिव विजय लहाने, टीसीएस कंपनीचे मयुर घुगे आदी उपस्थित होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा