बुधवार, ४ मे रोजी श्रीमती शैलजा भातखळकर यांची शोकसभा

बुधवार, ४ मे रोजी श्रीमती शैलजा भातखळकर यांची शोकसभा

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या मातोश्री श्रीमती शैलजा भातखळकर यांना सोमवारी देवाज्ञा झाली. सोमवार, २ मे रोजी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आता श्रीमती शैलजा भातखळकर यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आला आहे. बुधवार, ४ मे रोजी सायंकाळी ५ ते ७ दरम्यान कनकश्री हॉल, अशोकनगर, कांदिवली पूर्व येथे ही श्रद्धांजली सभा पार पडणार आहे.

सोमवार, २ मे रोजी आमदार भातखळकर यांना मातृशोक झाला. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. आरे येथील शिवधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version