भारत-म्यानमार देशाचा ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ करार अखेर रद्द!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

भारत-म्यानमार देशाचा ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ करार अखेर रद्द!

सरकारने भारत आणि म्यानमार दरम्यान होणाऱ्या मुक्त संचारावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.‘मुक्त संचार व्यवस्था’ करारानुसार दोन्ही देशातील सीमा भागातील लोकांना १६ किमीपर्यंत मुक्तपणे प्रवास करण्याची मुभा देण्यात येते.परंतु, हा करार आता रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी ट्विटरवर याची माहिती दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटकरत लिहिले की, आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे.देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या भारताच्या ईशान्येकडील राज्यांची लोकसंख्याशास्त्रीय संरचना राखण्यासाठी भारत आणि म्यानमारमधील ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ (FMR) रद्द करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने (MHA) घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालय सध्या ते रद्द करण्याच्या प्रक्रियेत असल्याने, MHA ने FMR तात्काळ निलंबित करण्याची शिफारस केली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

हे ही वाचा:

चकमकफेम प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

आपकडून आसाममध्ये तीन उमेदवार जाहीर

बोरीवली पूर्वेच्या टाटा स्टील मार्गावर उघडी गटारे ठरताहेत मृत्यूचे सापळे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राहुल गांधींनी पुन्हा जात काढली

म्यानमार आणि भारतादरम्यान कुंपण घालणार असल्याचं अमित शहा यांनी याअगोदरच जाहीर केलं होतं.भारत आणि म्यानमारदरम्यान १,६४३ किमींची सीमा आहे.या सर्व सीमेवर कुंपण घातले जाणार आहे.म्यानमार मधून अवैध घुसखोरी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.दोन्ही देशांकडून १९७० साली ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ (‘मुक्त संचार व्यवस्था’) कराराला मान्यता देण्यात आली होती.या करारानुसार दोन्ही देशातील सीमाभागावरील लोकांना १६ किमीपर्यंत मुक्तपणे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.मात्र, हा करार आता रद्द करण्यात आला असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे.

Exit mobile version