जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल

जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जावेद अख्तर यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील आशुतोष दुबे यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत अख्तर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जावेद अख्तर हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा हिंदुत्ववादी संघटनांची तुलना दहशतवादी तालिबानशी केली होती. अख्तर यांच्या या प्रतिक्रियेवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सर्व बाजूनी निषेध नोंदवला जात असून त्यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे.

हे ही वाचा:

भारतीय संघाच्या चिंता वाढल्या! रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव

जावेद अख्तर यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

अनिल देशमुख फरार; ईडीने बजावली लूकआऊट नोटीस

सावधान! गैर मुस्लिम मुलींना हिजाबच्या जाळ्यात ओढण्यासाठी सुरु आहेत कुरापती

अख्तर यांच्या याच आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात वकील आशुतोष दुबे यांनी ऑनलाइन माध्यमातून तक्रार केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. जावेद अख्तर हे मानखुर्द पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असल्यामुळे त्याच ठिकाणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. आशुतोष दुबे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता पोलिस या तक्रारीची दखल घेऊन जावेद अख्तर यांच्यावर कारवाई करणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version