अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. संगिता श्रीवास्तव यांनी प्रयागराजचे जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांना मशिदीवरील अजानच्या आवाजाने झोपमोड होत असल्याचे पत्र लिहीले आहे. त्यामुळे डोकेदुखी आणि कामाच्या तासांचे नुकसान होत आहे असे देखील त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
सिविल लाईन्स भागातील ध्वनी प्रदुषण, प्रयागराज या पत्रात प्रोफेसरने त्यांच्या घरापासून फक्त ४००मी. लांब असलेल्या लाल मस्जिदीवरील भोंग्यांमुळे सिविल लाईन्समध्ये ध्वनी प्रदुषण होत असल्याची माहिती दिली आहे.
या पत्रात प्रोफसर संगिता श्रीवास्तव यांनी लिहीलं आहे की, मी आपल्या लक्षात आणुन देऊ इच्छिते की रोज सकाळी ५.३० वाजता जवळच्या मशिदीतील मौलवींच्या अजानच्या आवाजामुळे माझी झोपमोड होते. नंतर कितीही प्रयत्न केला तरी झोप लागू शकत नाही. त्यामुळे दिवसभर डोकेदुखीचा सामना करावा लागतो आणि कामाचे तास वाया जातात. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. परंतु ते आझान बिना-माईक सुद्धा अदा करू शकतात, ज्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही. भारताचे संविधान धर्मनिरपेक्ष आणि सर्व समाजाचे लोक एकत्र राहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र ते प्रत्यक्षात आणले पाहिजे.
हे ही वाचा:
वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी, मित्रपक्ष झाले आक्रमक
सचिन वाझे प्रकरणात दुसरी मर्सिडीज एनआयएच्या हाती
लवकरच टोलमुक्ती होणार-नितीन गडकरी
याबाबत त्यांनी अलाहाबात उच्च न्यायालयाने दिलेला एका निकालाचा देखील हवाला दिला होता, ज्यात उच्च न्यायालयाने ध्वनिवर्धकांचा वापर करणे हे कोणत्याही धर्माचा अविभाज्य भाग असू शकत नाही असे मत व्यक्त केले होते.
या पत्रावर मौलाना खालिद रशिद यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्या पत्रात रशिद यांनी गंगा-जमनी तहजीबचा उल्लेख केला आहे. त्याबरोबरच अजानच्या आवाजाने कोणाचीही झोपमोड होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.