बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर-खान ही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला करिना हिचे तिसरे अपत्य कारणीभूत ठरू शकते. करिनाचे हे तिसरे अपत्य म्हणजेच तिचे नवे पुस्तक आहे. करिना कपूर हिने लिहिलेल्या पुस्तकाच्या नावावरून काही ख्रिश्चन संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी करिना विरोधात तक्रार दाखल केली आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्याशी विवाहबद्ध झाल्यापासून अभिनेत्री करिना कपूर हिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्याची चर्चाच अधिक असते. यात प्रामुख्याने करिना हिच्या दोन बाळंतपणांची आणि तिच्या मुलांची अधिक चर्चा असते. करिना हिने काही दिवसांपुर्वी तिने लिहिलेले नवे पुस्तक प्रकाशित केले. तिच्या गरोदरपणाच्या अनुभवांवर हे पुस्तक आधारित आहे. या पुस्तकाला करिना तिसरे अपत्य म्हणते. या पुस्तकाला ‘प्रेगनन्सी बायबल’ असे नाव तिने दिले आहे.
हे ही वाचा:
‘हर घर जल’…२३ महिन्यांत ४.५ घरांना नळ जोडणी
आयुर्वेद, होमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचा मोठा निर्णय
…पडळकरांच्या गाडीवर हल्ला करण्याची म्हणून झाली ‘छाती’
ठामपा उपायुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा…हकालपट्टीसाठी भाजपा आक्रमक
पण यावरूनच आता नवा वादंग सुरु होण्याची शक्यता आहे. कारण करीनाने पुस्तकाला दिलेल्या नावावरून काही ख्रिश्चन संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर या प्रकरणात आता पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीड मधील शिवाजी नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली गेली आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे हे या प्रकरणातले मुख्य तक्रारदार आहेत. धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. करिना कपूर, तिची सहलेखिका अदिती भीमजानी आणि प्रकाशक जॅगरनॉट प्रकाशन संस्था यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली गेली आहे.