सांताक्रूझ पोलिसांनी एका बनावटी डेबिट कार्ड बनवण्यारा व्यक्ती वर गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे हे डेबिट कार्ड १४ वेग वेगळ्या बॅंकचे असल्याचे माहिती आहे. त्या युवकाने तब्बल १ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.
वेंगसरकर अकादमीची पकड; हर्ष आघावचा बळींचा षटकार, रोहन नाबाद ८३
मालवणीतल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर लक्ष ठेवा!
चोरांनी साजरा केला शाहरुख खानचा वाढदिवस
ठाकरेंना सोडवेना अनैसर्गिक नात्याचा मोह…
आरोपींनी तीन दिवसात सांताक्रूझ पश्चिमेकडील एका खाजगी बँकेचा एटीएममधून पैसे काढले. ४ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर ह्या दरम्यान हा गुन्हा करण्यात आला अशी माहिती पोलिसाना प्राप्त झाली आहे.
हे सर्व समजल्यावर बँकेनेच या प्रकरणाचा तपास सीसीटीव्ही द्वारे केला. थोड्याच वेळात अंतर्गत तपास झाल्यावर हे समजले की बँकेच्या एटीएम परिसरात गेलेल्या ह्या आरोपीने आपल्या क्लोन केलेल्या डेबिट कार्डमधून पैसे काढले . बँकेच्या शाखेला मुख्य कार्यालयाकडून फसवणूक झाल्याबद्दल मेल प्राप्त झाले. ह्या नंतरच ताबडतोब तक्रार दाखल करण्यात आली . “तपासादरम्यान सापडलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून सायबर पोलीस आरोपींचा माग काढत आहेत आणि लवकरात लवकर तो आरोपी शोधला जाईल “, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. “११ ऑक्टोबर रोजी आम्हाला ८ हजार ५०० ते दहा हजार रुपयांपर्यंत पैसे काढल्याचे इशारा देणारे काही मेल करण्यात आले. आम्ही ताबडतोब त्या समस्यांवर योग्य कारवाई करायला सुरवात केली आहे “, असं बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपंकर मुंडल यांनी सांगितले, हे सर्व विधान बँकेच्या तक्रारीमध्ये नोंदविण्यात आले.