24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा व्हॉट्सऍपवर तक्रार

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा व्हॉट्सऍपवर तक्रार

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या सचिवांचे आवाहन

Google News Follow

Related

शहर आणि उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सऍपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय अहिरे यांनी केले आहे.

मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून होत असते. वाहतुकीदरम्यान प्रवाशांशी गैरवर्तन, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांविरोधात तक्रारी प्राप्त होत असतात. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि तक्रार करण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वरील व्हॉट्सॲप क्रामकावर मेसेज, फोटो किंवा ई-मेलद्वारे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. कॉल स्वीकारले जाणार नाहीत. तक्रारीमध्ये वाहन क्रमांक, ठिकाण, वेळ, थोडक्यात तक्रारीचे स्वरूप, तक्रारदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी नमूद करण्यात यावा. संबंधित दोषी चालकांवर मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले आहे.

बऱ्याचदा टॅक्सी किंवा रिक्षा चालक जवळचे भाडे नाकारतात. त्यांना जास्त भाड्याच्या लांब पल्याच्या भाड्याची अपेक्षा असते. रिक्षा थांब्यावर जाऊनसुद्धा असे रिक्षा चालक प्रवाशांना अत्यंत उद्धटपणे बोलून भाडे नाकारत असल्याच्या अनेक घटना रोज मुंबई तसेच उपनगरात घडत आहेत. यावरून अनेकदा प्रवासी आणि टॅक्सी चालक किंवा रिक्षा चालक यांच्यात वाद होतो. अनेकदा वाद विकोपाला जातो. रस्त्यात मारामाऱ्या झाल्याचा घटना घडल्या आहेत. खास करून पावसाळ्यात महिला आणि आबालवृद्धांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. भर पावसात भिजत असणारे प्रवासी जेव्हा भाड्याबद्दल विचारतात तेव्हा असे रिक्षा चालक बिनदिक्कतपणे ते भाडे नाकारतात. यावेळी सामान्य प्रवाशाला मनस्ताप सहन करून चलत जाणे किंवा पुन्हा नव्या रिक्षा किंवा टॅक्सीची वाट बघत बसण्याशिवाय पर्याय नसतो.

हे ही वाचा:

भारताकडे जगातील सर्वात मोठा कुशल कामगार पुरवठादार देशांपैकी एक बनण्याची क्षमता

अनध‍िकृत शाळांबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीचा विराट अवतार

श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण

तक्रार करावी तर कोठे करावी आणि कशी करावी याबद्दल सामान्य प्रवाशाला काही माहिती नसते. त्यामुळे असे उर्मट चालकांचे फावते. मात्र आता प्रशासनाने व्हाट्सअप क्रमांक जारी केल्याने अशा उर्मट चालकांवर छाप बसेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा