जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या पावडरमुळे कर्करोगाचा धोका असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी आता कंपनीला एका व्यक्तीला १५ मिलियन डॉलर्स किंवा सुमारे १२६ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
संबंधित व्यक्तीने २०२१ मध्ये खटला दाखल केला होता. कंपनीच्या बेबी पावडरसंबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करत दावा केला होता की, त्याच्या सततच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. कनेक्टिकटमधील इव्हान प्लॉटकिन या व्यक्तीने जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवर आरोप लावला होता की अनेक दशकांपासून या टॅल्क पावडरचा वापर केल्यामुळे त्याला मेसोथेलियोमासारखा दुर्मिळ कर्करोग झाला आहे. या व्यक्तीने २०२१ मध्ये त्याच्या आजाराचे निदान झाल्यानंतर कंपनीविरुद्ध खटला दाखल केला होता. उपचारानंतर आणि त्याच्या आजारातून बरे झाल्यानंतर, इव्हान प्लॉटकिनने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या विरोधात मैदानात उतरण्याची तयारी केली आणि फेअरफिल्ड काउंटी, कनेक्टिकट सुपीरियर कोर्टात खटला दाखल केला, कारण तिला गंभीर आजार झाला होता.
ज्युरीने प्रकरण गांभीर्याने घेतले आणि असे आढळले की जॉन्सन अँड जॉन्सनने नुकसान भरपाई द्यावी, जी नंतर केस हाताळणाऱ्या न्यायाधीशांद्वारे निश्चित केली जाईल. आता कंपनीला १५ दशलक्ष डॉलर्स देण्यास सांगितले आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या वतीने निवेदनात म्हटले आहे की, कंपनी ट्रायल जजच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध अपील करेल. जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी टॅल्क सुरक्षित आहे आणि त्यात एस्बेस्टोस नाही हे वैज्ञानिक चाचण्यांनी आधीच पुष्टी केली आहे. अशा स्थितीत कोणत्याही प्रकारचा कर्करोग होत नाही.
हे ही वाचा:
मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कुणाच्याही धार्मिक भावना दुखावत नाहीत
मराठा-ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची रणनीती, ‘विष कालवा, फुट पाडा अन मते मिळवा’
भारताला मिळणार ३१ प्रिडेटर ड्रोन; अमेरिकेशी ३२ हजार कोटींचा करार!
राज्यपाल नियुक्त ७ आमदारांनी घेतली शपथ!
अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनचा भारतातही मोठा व्यवसाय आहे आणि ती अनेक दिवसांपासून देशात बेबी पावडरची विक्री करत आहे. कंपनीचे जॉन्सन बेबी पावडर भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहे. ही पावडर बहुतेक घरांमध्ये लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. बेबी पावडर व्यतिरिक्त, कंपनी भारतात बेबी शॅम्पू, बेबी सोप आणि बेबी ऑइल देखील विकते आणि त्यांना प्रचंड मागणी आहे.