28 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषभारतात महिला 'बॉस'ची संख्या वाढली

भारतात महिला ‘बॉस’ची संख्या वाढली

Google News Follow

Related

ग्रँट थॉर्नटनच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय अहवाल-२०२२ मधून नवीन आकडेवारी समोर आली आहे. या सर्वेक्षणात २९ देशांतील दहा हजार कंपन्यांचा समावेश करण्यात आले होते. यानुसार, २०१७ मध्ये जगभरात एकूण महिला बॉस २५ टक्के आहेत, जे २०२२ मध्ये केवळ ३२ टक्के होते, परंतु आता भारतासाठी ही आकडेवारी अधिक चांगली आहे.

जगाच्या तुलनेत भारतात ३ पट अधिक महिला २०१७ मध्ये बॉस बनल्या आहेत. वरिष्ठ पदांवर यापूर्वी महिलांचे प्रमाण १७ टक्के होते, जे २०२२ मध्ये वाढून ३८ टक्के झाले आहे. म्हणजेच पाच वर्षांत जगात बॉस बनलेल्या महिलांपेक्षा सुमारे ३ पट भारतीय महिलांची संख्या जास्त आहे.

कोरोनामुळे नवीन कार्यपद्धतीचा महिलांनी फायदा घेतला असून, सर्वेक्षणानुसार, ६३ टक्के महिला कर्मचार्‍यांना घरातून काम केले आहे. ४९ टक्के लोकांनी असेही सांगितले की, कंपनीतील पुरुष आणि महिलांची सरासरी भागधारकांकडून दबाव टाकला जात आहे. त्याच वेळी, ९० टक्के लोकांचा असा विश्वास आहे की या नवीन कार्यपद्धतीमुळे, महिलांचे करिअर दीर्घकाळातही अधिक उंचावले जाऊ शकते.

हे ही वाचा:

नवरात्रीसाठी बाजार फुलले, धारावीच्या कुंभारवाड्यात लगबग सुरू

भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ‘ऑपरेशन मेघदूत’

करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

तसेच ४५ टक्के स्टार्टअपचे संस्थापक महिला असून, त्यामध्ये २.७ कोटी नोकरदार महिलांना केवळ पदोन्नती मिळत नाही, असे नाही. तर स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय उभारून रोजगरांच्या संधीही निर्माण करत आहेत. तर इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या अहवालानुसार, देशातील ४५ टक्के स्टार्टअप महिलांच्या मालकीचे आहेत. एवढेच नाही तर मध्यम आणि लघु उद्योगांमध्ये सुमारे २० टक्के महिला आहेत.

देशात सुमारे ४३२ दशलक्ष महिला काम करतात. महिला १.३५ – १.५७ कोटी उद्योगांच्या मालक आहेत आणि त्या २.२ ते २.७ कोटी लोकांना रोजगार देतात. असा अंदाज आहे की २०३० पर्यंत महिलांचे स्थापित उद्योग ३० दशलक्षांपर्यंत पोहोचतील, ज्यामध्ये १५-१७ कोटी लोकांना रोजगार मिळेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा