हेलिकॉप्टरच्या पात्याने झालेल्या मृत्यूप्रकरणी कंपनीची सेवा स्थगित

जेव्हा या प्रकरणाचा तपास पूर्ण होईल, तेव्हाच कंपनीची सेवा पूर्ववत होईल

हेलिकॉप्टरच्या पात्याने झालेल्या मृत्यूप्रकरणी कंपनीची सेवा स्थगित

गेल्या आठवड्यात हेलिकॉप्टरच्या पात्याच्या धक्क्याने झालेल्या अपघातात उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशन डेव्हलपमेंट ऑथोरिटी (यूसीएडीए)चे आर्थिक व्यवहाराचे नियंत्रक अमित सैनी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हे हेलिकॉप्टर पुरवणाऱ्या केस्ट्रेल एव्हिएशन कंपनीची सेवा स्थगित करण्यात आली आहे. या प्रकरणी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचा (डीजीसीए) तपास पूर्ण होईपर्यंत ही सेवा स्थगित राहणार आहे.

 

रविवारी दुपारी केदारनाथ येथे हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना सैनी यांच्या मानेला हेलिकॉप्टरच्या शेपटाकडील ब्लेड लागून त्यांचा मृत्यू झाला होता. ‘जेव्हा या प्रकरणाचा तपास पूर्ण होईल, तेव्हाच कंपनीची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला जाईल,’ अशी माहिती यूसीएडीएचे सीईओ रवीशंकर यांनी दिली.

 

डीजीसीएच्या या निर्णयामुळे केस्ट्रेल एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरची आगाऊ नोंदणी केलेल्या सुमारे एक हजार केदारनाथ यात्रेकरूंची अडचण झाली आहे. या कंपनीकडे केदारनाथ खोऱ्यातील फाट आणि सेरसी येथे सेवा पुरवण्याचे कंत्राट आहे. डीजीसीएच्या या निर्णयामुळे आता या भागात हेलिकॉप्टरची सेवा पुरवणाऱ्या आठ कंपन्यांवरच यात्रेकरूंची मदार असेल. त्यामध्ये सरकारच्या पवनहंसचाही समावेश आहे.

हे ही वाचा:

नारायण कार्तिकेयनला गवसला उद्योगाचा ‘फॉर्म्युला’; दोन वर्षांत १७८ कोटींचा उद्योग

भारतात येण्यासाठी आता दुबईत अडकलेल्या अभिनेत्रीला हवाय पासपोर्ट

निवासी, अनिवासी मालमत्ता विकून मिळाला १० वर्षातला विक्रमी महसूल

युक्रेनच्या अनेक शहरांवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांत २५ जणांचा मृत्यू

 

सोमवारी डीजीसीएच्या अपघात तपास मंडळाचे पथक या घटनेच्या अधिक तपासासाठी उत्तराखंडला पोहोचले आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून हेलिकॉप्टरमध्ये चढताना आणि उतरताना यात्रेकरूंनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Exit mobile version