एरवी भांडवलशाहीच्या विरोधात ओरड करणारे डाव्या पक्षातील नेते संपत्ती जमविण्याबाबत इतर कोणत्याही नेत्याच्या तोडीचेच असतात, याचे उदाहरण केरळमध्ये पाहायला मिळाले आहे.
५० लाखांची मिनी कूपर गाडी खरेदी करणारे कम्युनिस्ट नेते सोशल मीडियावर लक्ष्य ठरले आहेत. त्यांनी स्वत:ची बाजू मांडताना ही गाडी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या पत्नीची आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे. केरळमधील कम्युनिस्ट ट्रेड युनियन नेते, पेट्रोलियम आणि गॅस कर्मचारी संघाचे राज्य सचिव पीके अनिलकुमार यांचे छायाचित्र ५० लाख रुपये किमतीच्या मिनी कूपर गाडीसोबत व्हायरल झाले, तसतसे सोशल मीडियावरील लोकांनी त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
‘अनिल कुमार यांना मिनी कूपर खरेदी करून श्रीमंत लोक नेमके कसे राहतात, याचा अभ्यास करावयाचा आहे,’ अशा शब्दांत एका ज्येष्ठ पत्रकाराने या नेत्याची खिल्ली उडवली आहे. यावेळी या पत्रकाराने केरळमधील सत्ताधारी पक्ष सीपीआयएमचे नेते कोडियरी बालकृष्णन यांचा उल्लेख करत त्यांनीही या प्रकरणी एक अभ्यास केला होता, याची आठवण काढली.
हे ही वाचा:
शेवटचे तीन चेंडू धोनीने पाहिलेच नाहीत; पण जिंकल्यावर जाडेजाला उचलून घेतले
ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये चुकून डागल्याने भारताच्या तिजोरीला पडला खड्डा
धानोरकर यांच्या निधनाने उमदे, लढवय्ये नेतृत्व गमावले!
समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांना युगांडात मृत्युदंडाची शिक्षा
२०१७मध्ये कोडियरी यांनी सोन्याच्या तस्करीशी संबंधित एका लाल मिनी कूपर गाडीमधून प्रचार केल्यामुळे ते विवादात सापडले होते. एका व्यक्तीने तर ‘सर्व कॉम्रेड मिनी कूपरवर इतकं प्रेम का करतात?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर वाद उसळल्यानंतर अनिलकुमार यांनी त्यांची पत्नी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करत असून तिनेच ती खरेदी केल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र ‘पत्नी नोकरी करत असल्याचे स्पष्टीकरण ते कसे काय देऊ शकतात?,’ अशी विचारणा सोशल मीडियावर एका व्यक्तीने केली आहे.
अनिलकुमार वादात सापडण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. एका महिलेचा जातीवाचक उल्लेख करून तिचा अपमान करणे व तिला धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.