30 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेषबांग्लादेशात कम्युनिस्ट नेत्याची फासावर लटकवून हत्या !

बांग्लादेशात कम्युनिस्ट नेत्याची फासावर लटकवून हत्या !

केवळ हिंदू म्हणून जिहादींचे कृत्य

Google News Follow

Related

बांग्लादेशात सुरु असलेल्या हिंसाचारात एका कम्युनिस्ट हिंदूंची खांबाला लटकवून हत्या करण्यात आली आहे. प्रदीप कुमार भौमिक असे त्यांचे नाव असून दैनिक खोबोरपत्र वृत्तपत्राचे ते पत्रकार आहेत. कम्युनिस्ट नेते असणारे प्रदीप कुमार भौमिक हे बांगलादेश कम्युनिस्ट पार्टीचे (CPB ) सदस्य आहेत. भारतातील विरोधी पक्ष इंडी आघाडीतील नेत्यांनी याकडे लक्ष दिल पाहिजे. कारण तुम्ही कम्युनिस्ट किंवा सेक्युलर असाल तरी ते तुम्हाला काफीर हिंदू म्हणूनच ठार करतात.

बांगलादेशात वाढलेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. लष्कराने देशाचा ताबा घेतला असला तरी अजूनही काही ठिकाणी हिंसाचार सुरु आहेत. निष्पाप लोकांच्या घरावर हल्लेकरून त्यांची संपत्ती अन त्यांची हत्या करण्याचे प्रकरणे समोर येत आहेत. आंदोलकांनी हिंदू, अल्पसंख्यांक जातींना टार्गेट केल्याचे देखील समोर आले आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका हिंदूला खांबावर लटकवून मारहाण करत ठार मारण्यात आल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावरून बांगलादेशमध्ये हिंदूंची काय अवस्था होत आहे हे दिसून येते.

प्रदीप कुमार भौमिक हे पेशाने पत्रकार आणि बांगलादेश कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य असले तरी ते एक हिंदू आहेत म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून ‘जिहादीं’ची चाटुकारीता करूनही अंजाम वेगळा होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

विकासाला समोर ठेऊन लॉजिस्टिक धोरण जाहीर

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी ३ सप्टेंबरला होणार मतदान

पवार २०१९ ची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत?

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हणाले की, देशातील तमाम चीन समर्पित कम्युनिस्ट बांधवांच्या माहीतीसाठी… जिहादींची चाटुकारीता करूनही अंजाम वेगळा होत नसतो. जिहादींकडे एखाद्या देशाचे नियंत्रण जाते तेव्हा काय होते हे उघड्या डोळ्याने पाहा. तुम्ही कम्युनिस्ट किंवा सेक्युलर असाल तरी ते तुम्हाला काफीर हिंदू म्हणूनच ठार करतात, असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा