26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषपानाच्या दुकानात काम करणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगरने मिळविले रौप्य

पानाच्या दुकानात काम करणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगरने मिळविले रौप्य

Google News Follow

Related

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा; वेटलिफ्टिंगमधील कामगिरी

महाराष्ट्रातल्या सांगलीच्या संकेत महादेव सरगरने राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामिगरी करत भारताला पहिले राैप्यपदक मिळवून दिले आहे. २१ वर्षाच्या संकेतने वेटलिफ्टींगच्या ५५ किलाे वजनीगटात हा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या फेरीत दुखापतग्रस्त होऊनही सरगरने सुवर्णपदकासाठी प्रयत्न केले, मात्र त्याला यश आले नाही. तरीपण त्याच्या त्याच्या या यशामुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

संकेत, तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारा, स्वभावाने लाजाळू आहे आणि बाउट दरम्यान त्याच्या संघाच्या सपोर्ट स्टाफशिवाय कोणाशीही बोलत नाही. पुरुषांच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी शेवटच्या वेळी सतीश शिवलिंगम आणि रंगला वेंकट राहुल यांनी सुवर्ण जिंकले होते. संकेतला तो क्रम चालू ठेवता आला नाही. वेटलिफ्टिंग १९व्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत आहे. १९५० मध्ये प्रथमच या क्रीडा प्रकाराचा समावेश झाला. यावेळी १६ प्रकारात १८० खेळाडू सहभागी होत आहेत. यापैकी ९० पुरुष आणि ३९ महिला आहेत.

सुवर्ण जिंकल्यास वडिलांना मदत करेन

संकेत सांगलीतील आपल्या वडिलांच्या पान आणि खाद्यपदार्थाच्या दुकानात मदत करतो. त्याला आता आपल्या वडिलांना आराम पहायचा आहे. संकेतने अलीकडेच सांगितले होते की, “मी सुवर्ण जिंकल्यास वडिलांना मदत करेन. त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. मी त्यांना आता आनंदाची बातमी देईन.

हे ही वाचा:

राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने

मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द

राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावरून वाद

२५६ किलाे उचलून विक्रम माेडला

संकेतने यावर्षी फेब्रुवारीमध्ये सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनलमध्ये २५६ किलो (स्नॅचमध्ये ११३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १४३ किलो) वजन उचलून राष्ट्रकुल आणि राष्ट्रीय विक्रम मोडले.

२०२०मध्ये दोन सुवर्ण जिंकले

संकेत सरगरची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एनआयएस पटियाला येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. तो कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात इतिहासाचा विद्यार्थी आहे. संकेतने खेलो इंडिया युथ गेम्स २०२० आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा