27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषवर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियातील साम्यस्थळे

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियातील साम्यस्थळे

२००३ आणि २०२३च्या सामन्यांची होत आहे तुलना

Google News Follow

Related

विश्वचषक स्पर्धा २०२३च्या अंतिम फेरीत आता भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आमनेसामने येणार आहे. सन २००३च्या अंतिम सामन्यात आणि सन २०१५मध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यांमध्ये काही विलक्षण साम्येही आहेत.

सलग १० सामन्यांत विजय

सन २००३मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने सलग १० सामने जिंकून आपला अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. आता सन २०२३मध्ये भारतानेही सलग १० सामन्यांत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक दिली आहे. सन २००३मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धचा गटसाखळीतील सामना भारताने गमावला होता. तर, सन २०२३मध्ये चेन्नईत झालेला सामना ऑस्ट्रेलियाने गमावला. सन २००३मध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी भारताने आठ सामने जिंकले होते. तर, सन २०२३मध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी ऑस्ट्रेलियानेही आठ सामने जिंकले आहेत.

राहुल : यष्टीरक्षकाच्या भूमिकेत

सन २००३च्या विश्वचषक स्पर्धेत राहुल द्रविड याने भारताच्या यष्टीरक्षकाची धुरा समर्थपणे सांभाळून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. त्याने केवळ त्याच्या ग्लोव्ह्जने कमाल दाखवली नाही तर, सन २०२३मध्ये ११ सामन्यांत ३१८ धावा केल्या होत्या. हाच इतिहास आता पुन्हा लिहिला जात आहे. आता दुसरा राहुल म्हणजेच केएल राहुल भारताच्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे. ऋषभ पंत अपघातातून पूर्णपणे बरा न झाल्याने के. एल. राहुलकडे ही जबाबदारी आली आहे. केएल राहुलने फलंदाजीतही आपली कमाल दाखवली आहे. त्याने १० सामन्यांत ३८६ धावा केल्या आहेत. सन २००३मध्ये राहुल द्रविड याने विविध प्रकारे योगदान देऊन उपकर्णधारपदाची भूमिका नेटाने पार पाडली होती. तर, २०२३मध्ये हार्दिक पांड्याला अचानक स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्यामुळे के. एल. राहुल जणू उपकर्णधारपदाची जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळत आहे.

हे ही वाचा:

कामगाराची व्यथा; मी बोगद्यात अडकलोय, हे आईला सांगू नकोस!

वर्ल्डकपमुळे आयसीसी, देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळणार बुस्ट

चॅट जीपीटीची पालक कंपनी ओपन एआयच्या सीईओला दाखविला बाहेरचा रस्ता

आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल

भारतीय फलंदाज आघाडीवर

सन २००३मध्ये भारतीय फलंदाज सर्वाधिक धावा करण्यात आघाडीवर होते. हीच बाब सन २०२३मध्येही झाली. सचिन तेंडुलकर याने सन २००३च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक ६७३ धावा केल्या होत्या. तर, सन २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने आतापर्यंत ७११ धावा चोपल्या आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना अजून बाकी आहे.

भारताचाही तिसरा विश्वचषक असेल

सन २००३मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगचा संघ तिसऱ्यांदा विश्वविजेता ठरला होता. आता सन २०२३चा अंतिम सामना भारताने जिंकल्यास हादेखील भारताचा तिसरा विश्वचषक असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा