ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी तसेच नागरिकांना इंटरनेटचा वापर करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ‘पीएम-वाणी’ ही योजना राबवली जाणारा आहे. स्वस्त रेशनधान्य मिळणाऱ्या दुकानाच्या परिसरात ही ‘वाय-फाय’ इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातीत ‘पीएम-वाणी’ योजनेसाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली व पालघर या जिल्ह्यांच्या पहिल्या टप्प्यात ही योजना चालू करण्यात येणार आहे.
साधारण रेशनधान्य दुकानाच्या आसपास ही २०० मीटर पर्यंत या इंटरनेट वायफायचा परिघ असणार आहे. तसेच अल्पदरात या वायफाय इंटरनेटचा दर असणार आहेत. तसेच या येजनेच्या माध्यमातून सरकारच्या सर्व योजना सामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी ही योजना चालू करण्यात येणार आहे. तसेच सर्व सामान्य नागरिकांना सरकारची माहिती पोहोचण्यासाठी डिजिटल चॅनेल ही सुरु केले जाणार आहे. देशभरात सर्वत्र इंटरनेट चा वापर वाढत आहेत, पण ग्रामीण भागात अजून तितकासा इंटरनेटचा प्रभाव दिसून येत नाही. यासाठी ‘पीएम-वाणी’ ही योजना राबवली जाणार आहे.
साधारणपणे शहरी भागात वापरकत्यांपेक्षा ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर केवळ १ तृतीयांश नागरिक करतात असे आढळून आले आहे. तसेच ग्रामीण भागातील दुर्गम भागांपर्यंत नागरिकांना इंटरनेट सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ही योजना केंद्र सरकार तर्फे योजना सुरु केली जात आहे. यासाठी सार्वजनिक डेटा केंद्र उभारली जाणार आहेत. त्याद्वारे या परिसरात ही वायफाय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी सार्वजनिक रास्त भावात धान्य मिळणाऱ्या दुकानदाराला ही मान्यता देण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
न थकण्याचे रहस्य सांगताना मोदी म्हणाले, मी दोन-चार किलो शिव्या खातो!
दोन विमाने हवेतच एकमेकांवर आदळली आणि उसळला आगीचा डोंब
सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात
या योजनेअंतर्गत रेशनधान्य दुकाने ही सार्वजनिक डेटा कार्यालय म्हणून ओळखली जाणार आहे. रेशनधान्य दुकानदाराला वायफाय राऊटर खरेदी करून दुकानात बसवावा लागेल. यासाठी त्यांना अगोदर नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे रेशनधान्य दुकानदाराला अजून एक उत्पन्नाचा साधन उपलब्ध होणार आहे. सध्या ‘पीएम-वाणी’ योजना ही मध्य प्रदेशातील उज्जेन, उत्तर प्रदेशातील दहा जिल्ह्ये, तर उत्तरखंडमधील डेहराडून आणि आंध्र प्रदेशातील कर्नुल भागातील जिल्ह्यांमध्ये ही योजना यशस्वी झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा ही वायफाय योजना राबवली जाणार आहे.