बारसू रिफायनरी प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी समिती

तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार

बारसू रिफायनरी प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी समिती

बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला गती येऊन लवकरच हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात सोमवार, ११ सप्टेंबर रोजी यासंदर्भात बैठक झाली असून सहमती झाली आहे. या प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी आता एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

बारसू मधील या प्रकल्पाची किंमत सुमारे ४ लाख कोटी इतकी असून या प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाली आहे आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या झालेल्या बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आगामी वर्षात सौदी अरेबिया भारतात सुमारे ८.२० लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर अली आहे.

हे ही वाचा:

आमदार अपात्रतेप्रकरणाची सुनावणी १४ सप्टेंबरला

मोरोक्को भूकंप आणि भारतासाठी धडा

चंद्राबाबू नायडू १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत

भारताची पाकिस्तानवर विक्रमी मात

कोकणातील राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प रद्द केल्याच्या अधिसूचनेनंतर बारसूतील सोलगाव परिसरात ही क्रूड ऑइल रिफायनिंग कंपनी प्रस्तावित आहे. हा रिफायनरी प्रकल्प या परिसरात सुमारे १३ हजार एकर जागेवर प्रस्तावित आहे. दरम्यान, स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे. प्रकल्पामुळे कोकणतील निसर्ग, पारंपरिक व्यवसाय नष्ट होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारकडून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Exit mobile version