27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषगृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध

गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न प्राधान्यांने सोडवण्यासाठी शासन दरबारी जरूर प्रयत्न करू. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्येक दोन महिन्यातून एकदा गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल आणि यासाठी सहकार भारतीच्या प्रतिनिधींना सुद्धा आमंत्रित करण्यात येईल, असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज चेंबूर येथे बोलताना केले. सहकार भारतीच्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय महा अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकूर, डॉ. उदय जोशी, प्रदेशाध्यक्ष आहिरे, यशवंत सावंत, मुदित वर्मा, सुजित झा, भूषण पैठणकर, राहुल पाटील, मंगेश पवार आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री लोढा म्हणाले, सहकार भारतीने उभे केलेले कार्य हे उत्तम आहे. गृहनिर्माण संस्थांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवून लोकांना न्याय देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.

हेही वाचा..

कोटामधील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

राहुल गांधींच्या अडचणींत वाढ; आसामच्या सीआयडीने पाठवले समन्स!

संदेशखालीचे वार्तांकन करणाऱ्या टीव्ही पत्रकाराला अटक

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली संदेशखालीतील पीडितांची भेट!

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर म्हणाले, सहकार भारतीच्या वतीने जे प्रस्ताव शासनाकडे ठेवण्यात आले त्यास कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तात्काळ मंजुरी दिली. हा सहकार भारतीचा प्रभाव आहे. सहकार भारती सारखे सक्षम असे देशात एकही मोठे संघटन सहकार क्षेत्रात नाही. त्यामुळे काम करायला प्रचंड वाव आहे. समर्पित भावनेने क्षमता वाढवावी लागेल. विकसित भारतासाठी हे महत्त्वाचे असल्याचे ठाकूर म्हणाले.

स्वागताध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले, देशात राज्यात शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरीकरणाचा वेग सध्या सुमारे 60 टक्के इतका आहे. ज्या पद्धतीने देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असताना गृहनिर्माण संस्थांचे जाळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. गृहनिर्माण संस्थांच्या संदर्भातील नियम, कायदे समजून घेण्याची आवश्यकता असताना हे काम अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे सुद्धा असल्याचे आमदार शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. उदय जोशी यांच्यासह मान्यवरांची भाषणे पार पडली. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून अधिवेशनाचा प्रारंभ करण्यात आला. या अधिवेशनात देशभरातील विविध राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. दिवसभर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अधिवेशनाचे कामकाज पार पडले. आभार विजय शेलार यांनी मानले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा