मुंबईकरांसाठी लोकल नाहीच

मुंबई २९ जानेवारीपासून लोकल सेवा सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. मुंबईत लोकल्सच्या फेऱ्या आता पुन्हा कोविड-१९ पूर्वीच्या संख्येने होणार आहेत. परंतु अजूनही आम जनतेला लोकलचा प्रवास करण्याची परवानगी मिळेल अशी शक्यता नाही.

मुंबईत सध्या २७८१ लोकलचा फेऱ्या होत आहेत. यातील मध्य रेल्वेच्या १५८० तर पश्चिम रेल्वेच्या १२०१ गाड्या धावत आहेत. रेल्वेने हा आकडा क्रमशः २९८५, १६८५ आणि १३०० असा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अजूनही आम जनतेसाठी ‘कमिंग सून’ ची आश्वासनं कायम आहेत.

महाराष्ट्र सरकारचे अनेक मंत्री ऑक्टोबर महिन्यापासून दर महिन्याला एकच वक्तव्य करत आले आहेत. मुंबईत लवकरच लोकल्स सुरु करणार असल्याची माहिती ते वारंवार देत आले आहेत. दर महिन्याला, “येत्या १५ दिवसात लोकल सेवा सुरु करणार” अशी माहिती अनेक मंत्र्याने वारंवार दिली होती. मुंबईत लोकल सेवा बंद केल्यामुळे बसमध्ये गर्दी तुडुंब वाढली आहे. त्यासाठी सरकारने एसटीच्या बसेस मुंबईतल्या रस्त्यांवर आणल्या आहेत. यातून मुंबईतील प्रदूषण सुद्धा कैक पटींनी वाढत आहे, कारण एसटी बसेस या बेस्ट बसेस पेक्षा कैक पटींनी जास्त प्रदूषक आहेत. शिवाय एकंदर बसची संख्या वाढल्याने हरित वायू उत्सर्जन देखील वाढले आहे. या प्रश्नावर महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अजूनही गप्प आहेत. शिवाय गर्दी कमी करून ‘सोशल डिस्टंसिंग’ होईल अशीही चिन्ह दिसत नाहीत. उलट गर्दी वाढल्याने सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा उडाल्याचेच दिसते.

यामुळे अजून किती काळ मुंबईकरांना लोकलची वाट पाहावी लागणार? असा प्रश्न मुंबईतील चाकरमान्यांना भेडसावत आहे.

Exit mobile version