कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. आज, १० ऑगस्ट रोजी सकाळी ट्रेडमिलवर धावत असताना ते खाली कोसळले.
राजू श्रीवास्तव (५८) दिल्लीमध्ये जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना सौम्य झटका आला आणि त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर हृदयविकारावर उपचार सुरू आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
“राजू सरांना व्यायाम करत असताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे, पण त्यांची प्रकृती ठीक आहे. ते शुद्धीत आहेत,” त्यांच्या टीमने ही माहिती दिली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन असण्यासोबतच राजू श्रीवास्तव हे भाजपाचे नेते देखील आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
ही वाचा:
जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!
आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केला नाही?
दहशतवादी हल्ल्याच्या कटप्रकरणी एम आय एमच्या सदस्याला अटक
राजू श्रीवास्तव यांनी बॉलीवूड चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ज्यामध्ये त्यांनी मैंने प्यार किया, बाजीगर, बॉम्बे टू गोवा, आमदानी अथन्नी खर्चा रुपैया यासह इतरांचा समावेश आहे. त्याने द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या टॅलेंट शोसह स्टँड-अप कॉमेडीमध्ये प्रवेश केला. श्रीवास्तव यांनी बिग बॉस सीझन ३, कॉमेडी शो कॉमेडी का महा मुकाबला, नच बलिए सीझन ६ आणि कॉमेडी नाइट्स विथ कपिल यासह रिऍलिटी टीव्ही शोमध्ये भाग घेतला.