स्टॅण्ड अप कॉमेडीयन कुणाल कामराला मुंबई हायकोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. मुंबई हायकोर्टाने कुणाला कामरावरील गुन्हे रद्द करण्यास नकार दिला आहे. आपल्यावरील गुन्हे रद्द व्हावेत यासाठी कुणाल कामराने कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने गुन्हे रद्द करण्यास नकार दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचं नाव न घेता व्यंगात्मक गाणं आणि गाण्यात गद्दार उल्लेख केल्याप्रकरणी कुणाल कामराविरोधात चार गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे रद्द व्हावे यासाठी कुणाल कामराने मुंबई हायकोर्टात रीट याचिका दाखल केली होती. मात्र, गुन्हे रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठांसमोर ही सुनावणी पार पडली. माझ्यावरील कारवाई म्हणजे माझ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन तसेच संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच उल्लंघन असल्याचा दावा कुणाल कामराने आपल्या याचिकेत केला होता.
हे ही वाचा :
तुमच्या आजीने स्वातंत्र्यवीरांना पत्र पाठवले होते, हे विसरलात का?
प. बंगालच्या आसनसोलमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा
मानहानी खटला प्रकरणी मेधा पाटकर यांना अटक
जम्मू काश्मिरात लष्कर ए तोयबाच्या टॉप कमांडरला घातल्या गोळ्या!
या प्रकरणी १६ एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. यानंतर आज (२५ एप्रिल) सुनावणी पार पडली आणि कोर्टाने गुन्हे रद्द करण्यास नकार दिला. दरम्यान, कोर्टाने गुन्हे रद्द करण्यास नकार दिला असला तरी त्याला अटकेपासून संरक्षण दिले आहे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत कोर्टाने कामराला अटकेपासून संरक्षण दिले आहे.