“छत्रपतींचे चरित्र अनुभवायला शिवतीर्थावर या”

भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांचे सर्व जनतेला आव्हान

“छत्रपतींचे चरित्र अनुभवायला शिवतीर्थावर या”

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या चरित्राचे प्रेरणादायी महापर्व अनुभवायला शिवतीर्थावर या असे आव्हान मुंबई भाजप अध्यक्ष आमदार एड. आशिष शेलार यांनी केले आहे.  राज्यामध्ये शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यावर भाजप पक्षातर्फे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र,दिवाळी, शिवजयंती असे सर्व सण  जल्लोषात  साजरे केले जातात. म्हणूनच आशिष शेलार यांनी छत्रपतींचा इतिहास आणि जीवनचरित्र सांगणारे आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतले “जाणता राजा “हे छत्रपतींचे महानाट्य मंगळवार १४ मार्च २०२३ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत संध्याकाळी ठीक पावणे सात वाजता , सहा वाजून ४५ मिनिटांनी दादर शिवाजी पार्क येथे सहा प्रयोगांची मालिका सादर होणार आहे.

 

या मालिकेच्या विनामूल्य प्रवेशिका या शिवाजी मंदिर दादर, प्रबोधनकार ठाकरे सभागृह बोरिवली, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले , कालिदास नाट्यगृह मुलुंड आणि दामोदर नाट्यगृह परेल या सर्व ठिकाणी नऊ मार्च पासून उपलब्ध होणार आहे. यासाठी खास रोज दहा हजार प्रेक्षक हे महानाट्य बघू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या मालिकेसाठी शीर्षक प्रायोजक ‘सुगी’ हे नामवंत विकासक असून सह-शीर्षक प्रायोजक भारतीय स्टेट बँक असणार आहे.
काय आहे महानाट्य ?
छत्रपतींच्या चरित्रावरील हे महानाट्य भव्य अशा पाच मजली रंगमंचावर असून फिरता रंगमंच हे त्याचे विशेष आकर्षण असणार आहे. याशिवाय आकर्षक प्रकाश योजनांसह यामध्ये घोडे, बैलगाड्या यांचा सुद्धा समावेश असणार आहे. तर २५० पेक्षा अधिक कलाकार यामध्ये काम करणार आहेत. नेत्रदीपक रोषणाई, आकर्षक रंगसंगती ,यासह शिवजन्म पूर्व काळ, शिवबाचा जन्म, महाराजांचा न्याय निवडा , रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, अफजलखान वध, सुरत छापा, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका, आणि सर्वात महत्वाचा म्हणजे महाराजांचा रोमहर्षक राज्याभिषेक सोहळा अशा अनेक उत्कंठावर्धक प्रसंगाचे सादरीकरण ह्या नाट्यात केले जाणार आहे. असे शेलार यानी   पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

हे ही वाचा :

ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा

स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर

हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!

जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू

स्वतंत्र्य भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आग्रा किल्ल्यावर छत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. भारतीय नौदलाचे नवे चिन्ह हे महाराजांकवून प्रेरित होऊन करण्यात आले आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या काळात अफजल खानच्या थडग्याभोवतीचे अतिक्रमण हटवण्याचे काम करण्यात आले आहे. भाजप पक्ष नेहमीच छत्रपतींचे विचारांवर वाटचाल करते. महाराजांचे कार्य नवीन पिढीला कळण्यासाठी हा आमचा प्रयत्न असून हे प्रयोग मुंबईकरांना प्रेरणादायी होतील. असा विश्वास आशिष शेलार यानी यावेळेस व्यक्त केला. महाराजांचे चरित्र हे विलक्षण प्रेरणादायी असल्यामुळे सर्व मुंबईकरांनी या महानाट्याचा अनुभव घ्यावा असे आवाहनच शेलार यांनी या पत्रकार परिषदेत केले आहे. या परिषदेला महाराजा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीनिवास वीरकर , सुगीचे प्रसन्न कर्णिक आणि एसबीआयचे प्रकाशचंद्र बरोड हे पण उपस्थित होते.

Exit mobile version