आता माथेरानला ई-रिक्षाने जा!

ही वाहतूकीची सुविधा उपलब्ध पर्यावरणास अनुकूल असेल आणि प्रदूषण ही कमी करेल.

आता माथेरानला ई-रिक्षाने जा!
आता प्रवाशांना माथेरान या पर्यटन स्थळावर जायला  टांगे नसतील. लवकरच एक नवीन वाहतूकीची सुविधा उपलब्ध होईल जी पर्यावरणास अनुकूल असेल आणि प्रदूषण ही कमी करेल. ती सुविधा म्हणजे ई-रिक्षा!
 ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ घोषित केलेल्या हिल स्टेशनवर टॉय ट्रेनची सेवा सुरू झाल्यानंतर एक शतका नंतर  माथेरानच्या वाहतुकीच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. पाच पिवळ्या-काळ्या रंगांच्या  ई-रिक्षांनी सोमवारी दस्तुरी नाका ते माथेरान रेल्वे स्थानक पर्यंत २ किमीच्या अंतरावर वाहतूक सेवेची चाचणी सुरू केली. एका प्रवाशासाठी एकेरी भाडे ३५ रुपये आहे. चालकाच्या व्यतिरिक्त तीन लोक त्या इलेक्ट्रिक वाहन बसू  शकतात. आणखी दोन ई-रिक्षा या सेवेत सामील होणार आहेत.
आत्तापर्यंत, माथेरानमधील वाहतुकीच्या साधनांमध्ये हाताने ओढलेल्या रिक्षा, घोडे, टॉय ट्रेन, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका याशिवाय सामान आणण्यासाठी वापरण्यात येणारे पोनी यांचा समावेश होता. त्यामुळे ई-रिक्षाच्या ट्रायल रनमुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे कारण त्यांना आता घोडेस्वारीला पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच, शाळेत जाणारी मुले, वयोवृद्ध व्यक्तींसह इतर स्थानिकांना त्यांच्या प्रवासाच्या त्रासातून काही प्रमाणात दिलासा मिळेल. रास्ता चांगला नसल्याने ४.५ किमी च्या जागी फक्त २ किमी च्या रस्त्यावर चाचण्या करण्यात आल्या. म्हणूनच पेव्हर ब्लॉक टाकायचा निर्णय घण्यात आला होता.

हे ही वाचा:

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला

‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’

पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

वाहनांचे व्यवस्थापन करणारी एजन्सी अपेयरॉन  मार्केटिंग कन्सल्टन्सीचे मालक रवींद्र जाधव म्हणाले, ” चाचणी रनच्या पहिल्या दिवशी जवळपास ४०० लोकांनी प्रवास केला. पर्यटकांना घेऊन जाणारे घोडेस्वार व्यवसायाच्या नुकसानीच्या भीतीने ई-रिक्षाच्या विरोधात होते. कारण त्यांच्या वृत्ती प्रमाणे ई-रिक्षा साठी टाकल्या जाणाऱ्या पेव्हर ब्लॉकमुळे घोड्यांसाठी ही धोका निर्माण होतोय “.
Exit mobile version