ऑनलाईन शॉपिंगचा आलेल्या अनुभव एका महिलेने शेअर केला आहे, ज्याने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एका कोलंबियन महिलेने दावा केला की, ॲमेझॉनवर ऑर्डर केलेल्या एअर फ्रायर ऐवजी पॅकेजमध्ये ‘सरडा’ मिळाला आहे. सोफिया सेरानो असे दावा करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याबाबत तिने ट्विटरवर पोस्ट शेअर केली असून या पोस्टला ४.१ मिलियन लोकांनी पाहिले आहे. सोफिया सेरानोने ॲमेझॉन पॅकेजमध्ये सापडलेल्या सरड्याचे छायाचित्र शेअर केले आहे.
सोफिया ही कोलंबियाची रहिवासी असल्याची माहिती आहे. तिने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवरून एअर फ्रायर ऑर्डर केले होते. एअर फ्रायरऐवजी, तिला बॉक्समध्ये एक मोठा सरडा सापडला. सोफिया सेरानोने पॅकेजचे छायाचित्र पोस्ट केले आणि कॅप्शन दिले, “आम्ही ॲमेझॉनद्वारे एअर फ्रायरची ऑर्डर दिली आणि ते एका साथीदारासह आले, मला माहित नाही की ही ॲमेझॉनची चूक होती की वाहकाची चूक,” एवढ्या मोठ्या आकाराचा सरडा पाहून ती घाबरली, असे पोस्टमध्ये तिने म्हटले आहे. रिपोर्टनुसार, पॅकेजमध्ये सापडलेला सरडा ‘स्पॅनिश रॉक लिझार्ड’ असल्याची माहिती आहे. ॲमेझॉनने अद्याप सोफिया सेरानोच्या व्हायरल पोस्टवर प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे ही वाचा:
मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओव्हर फ्लो!
इस्लामिक सेंटर हॅम्बर्गवर जर्मनीने घातली बंदी !
कारच्या बॉनेटवर बसला होता ‘स्पायडरमॅन’, पोलिसांनी जाळे टाकून केली कारवाई !
दुर्गतपस्वी, ज्येष्ठ इतिहास संकलक अप्पा परब यांना ‘शिवसन्मान पुरस्कार’ !
Pedimos una air fryer por Amazon y nos llegó con un acompañante 🙄 no sé si fue culpa de Amazon o la transportadora … buenos días! pic.twitter.com/BgYDi4qUev
— Sofia Serrano (@sofiaserrano97) July 18, 2024
दरम्यान, सेरानोच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासोबत असे घडले असते तर मी मेलो असतो असे एका सोशल मीडिया वापरकर्त्यांनी म्हटले. तसेच या प्राण्याला सुखरूप सोडण्याची विनंती सोशल मीडिया वापरकर्त्याने केली आहे.