आफ्रिकेतून आलेले चित्ते स्थिरस्थावर झाल्यानंतर आता भारतातल्या अभयारण्यात नवीन पाहुण्यांचे लवकरच आगमन होत आहे. हे पाहुणे कोलंबियातून येत आहेत. हे पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून हिप्पो म्हणजेच पाणघोडे आहेत. एक नाही दोन नाही तर तब्बल ७० पाणघोडे भारतात नव्याने वास्तव्याला येत आहेत. कोलंबियामध्ये या पाणघोड्यांची संख्या खूप झाली आहे. त्यामुळे आता हे पाणघोडे इतर देशांमध्ये पाठवण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून हे ७० कोकेन पाणघोडे भारतात स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अभयारण्यात त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
हे पाणघोडे ड्रग स्मगलर पाब्लो एस्कोबारच्या खाजगी प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांना त्यांना कोकेन हिप्पो असे म्हटले जाते. त्यांना स्थलांतरित करण्यासाठी ३.५ अब्ज दशलक्ष खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही योजना कोलंबियन कृषी संस्था, कोलंबियन वायुसेना आणि मेक्सिकोमधील ऑस्टोक रिझर्व्हसह विविध संस्थांसह स्थानिक अँटिओक्विया सरकारने स्वाक्षरी केलेल्या कराराचा भाग आहे. त्यानुसार ६० पाणघोडे भारतातील अभयारण्यात आणले जातील.
पाब्लो एस्कोबारच्या प्रदेशातून पाणघोड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात सगळीकडे पाणघोडे बघायला मिळतात . त्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी विविध उपायांचा अवलंब केला. पण तरीही या पाणघोड्यांची संख्या आता वाढून १३० वरून १६० वर गेली आहे. मूळ पाणघोडे हे विदेशी प्राण्यांच्या प्राणीसंग्रहालयाचा भाग होते. हे प्राणी संग्रहालय १९८० च्या दशकात पाब्लो एस्कोबारने उभारले होते. पाब्लो एस्कोबारचा १९९३ मध्ये मृत्यूनं झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी बहुतेक प्राण्यांचे स्थलांतर केले.
दहा पाणघोडे मेक्सिकोला पाठवले जातील. भारतातील एका अभयारण्यात ६० पाणघोडे येतील. योजनेनुसार, कोलंबियामधून ६० पाणघोडे गुजरातमधील प्राणीशास्त्रीय बचाव आणि पुनर्वसन राज्याकडे पाठवले जाणार आहेत. उर्वरित १० पाणघोडे मेक्सिकोतील प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव अभयारण्यांमध्ये पाठवले जाणार आहेत. हे पाणघोडे, त्यांच्या अन्नासह, ट्रकमधून लोखंडी कंटेनरमध्ये १५०किमी अंतरावर असलेल्या रिओनेग्रोमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेले जातील, तेथून त्यांना भारत आणि मेक्सिकोमध्ये विमानाने नेले जाईल.
हे ही वाचा:
हिंसक घटनांमुळे अमित शहांची सभा रद्द; सासारामला होणार होते भाषण
पालघरच्या समुद्रात सापडली बोट, पोलिसांनी केला पाठलाग आणि..
मालेगावचे उबाठा गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यासह ३२ जणांवर गुन्हा
संजय राऊत यांना धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
कसे असतात पाणघोडे ?
हिप्पो हा निसर्गातील सर्वात शक्तिशाली प्राण्यांपैकी एक आहे. पाणघोडे फक्त हत्ती आणि गेंड्यांपेक्षा लहान आहेत. आफ्रिकेच्या उप-सहारा प्रदेशात पाणघोडे मोठ्या प्रमाणात आढळतात. पाणघोडे त्यांचे बहुतेक आयुष्य नद्या आणि तलावांच्या खोल पाण्यात घालवतात आणि अनेकदा फक्त अंधारातच पृष्ठभागावर येतात. पाणघोडे पाण्यात किंवा जमिनीवर असताना हल्ला करण्यास सक्षम असतातलहान, अडगळलेले पाय आणि कडक शरीर असूनही, पाणघोडे जमिनीवर ताशी १८ मैल वेगाने धावू शकतात आणि अन्नाच्या शोधात प्रति रात्र सरासरी सहा मैल चालतात.पाणघोडे दिवसाचे सुमारे 16 तास पाण्यात घालवतात. जागृत असताना, ते पाच मिनिटांपर्यंत त्यांचा श्वास रोखू शकतात. जेव्हा ते पाण्यात झोपतात तेव्हा ते आपोआप पृष्ठभागावर पोहोचतात आणि जागे न होता श्वास घेतात. पाणघोडे पाण्याबाहेर जास्त काळ जगू शकत नाहीत कारण त्यांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते, सूर्यप्रकाश आल्यावर त्यांची त्वचा विस्कळीत होते, म्हणूनच पाणघोडे बहुतेकदा रात्रीच जमिनीवर येतात. त्यांच्या शरीरातून एक लाल पदार्थ स्राव होतो, जो सनस्क्रीन आणि प्रतिजैविक असे दोन्ही काम करतो.मादी पाणघोड्याचे वजन सुमारे १,४०० किलो तर नर पाणघोड्याचे वजन १,६०० ते ४,५०० किलो असते.