राज्यातील महाविद्यालये सुरू होण्यास सापडला मुहूर्त

राज्यातील महाविद्यालये सुरू होण्यास सापडला मुहूर्त

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या असून आता राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली आहे. राज्यातील कॅबिनेट मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली असून या बैठकीत २० ऑक्टोबरपासून सर्व महाविद्यालये सुरू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून ५० टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असेल अशा जिल्ह्यांसाठी वेगळी नियमावली असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

…म्हणे मावळमधील गोळीबार भाजपाने भडकाविल्यामुळे!

‘ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा टंचाईचे संकट’

कबड्डीचा सराव करत असतानाच मुलीची हत्या करणारा आरोपी ताब्यात

काय आहे १०० लाख कोटींची गती शक्ती योजना?

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण होणे महत्त्वाचे असून कोरोना संबंधित सर्व नियम पाळूनच महाविद्यालये सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पोहचण्यासाठी लोकल ट्रेनची गरज असणार आहे. अशा संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जाणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Exit mobile version