राज्यातील महाविद्यालये या तारखेपासून होणार सुरू

राज्यातील महाविद्यालये या तारखेपासून होणार सुरू

राज्यातील शाळांपाठोपाठ आता राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाचे सर्व नियम पालन करून महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याने काही दिवसांपूर्वी राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केले आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२२ राज्यातील महाविद्यालये सुरू होणार आहेत. महाविद्यालयात येण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावे, असे सांगण्यात आले आहे.

शाळांबाबत निर्णय झाल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्यााबाबत राज्य सरकारकडून हलचाली सुरू होत्या. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला होता, अखेर त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवल्याने महाविद्यालये सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राज्यातली महाविद्यालये सुरू करताना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाची तिसरी लाट आली असली तरी बऱ्यापैकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्याने महाविद्यालये सुरू करण्याबाबत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याबाबत शासन सकारात्मक होते, त्याच अनुशंगाने हा निर्णय आज घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

भाजपाच्या आक्रमक भूमिकेनंतर राऊतांनी ते ट्विट केलं डिलीट

आनंद महिंद्र यांनी पाळले वचन; दिली नवी कोरी बोलेरो!

आनंद महिंद्र यांनी पाळले वचन; दिली नवी कोरी बोलेरो!

…म्हणून महाराष्ट्रातील चार मुलांना मिळाला राष्ट्रीय बाल पुरस्कार

विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थिती लावण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरू करताना सोबतच शासन लसीकरणावर भर देत आहे.

Exit mobile version