पुण्यात एका युवतीवर कोयत्याने झालेल्या हल्ल्यात त्या युवतीला वाचविण्यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्या मुलीवर हल्ला करणाऱ्या विकृत युवकाला अटक करणे शक्य झाले.
शंतनू जाधव असे हल्ला करणाऱ्याचे नाव असून तो त्या तरुणीच्या संपर्कात होता पण तिने त्याच्याशी बोलणे काही दिवसांपासून टाळल्यामुळे तो संतापला होता. त्याने मंगळवारी सदाशिव पेठेत ती युवती आपल्या मित्रासमवेत कॉलेजला निघालेली असताना आरोपीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीच्या मित्राने त्याला थांबवले. तेव्हा जाधवने कोयता काढून त्या तरुणीच्या मित्रावर हल्ला केला. त्यामुळे घाबरून तो मित्र पळून गेला. त्यानंतर हा विकृत तरुण तरुणीच्या मागे धावू लागला. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ होती. त्यावेळी लेशपाल जवळगे या मुलाने आरोपीच्या हातून कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला दुखापत झाली. त्यानंतर आणखीही काही मित्र तिथे धावत आले आणि शंतनू जाधवला पकडले.
या सगळ्या प्रकारात रस्त्यावर पोलिस नव्हते आणि नंतरही ते वेळेत पोहोचले नाहीत असा स्थानिकांचा आरोप होता. पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी १५ मिनिटे लागली असा उपस्थितांचा आरोप आहे.
हे ही वाचा:
हिंदू सहिष्णू आहेत म्हणून त्यांची परीक्षा पाहायची का? ‘आदिपुरुष’वरून न्यायालयाने झापले
‘आम्ही सलमान खानला ठार मारूच’ गँगस्टर गोल्डी ब्रार याची दर्पोक्ती
निधी सिंगची जागतिक विद्यापीठ गेम्ससाठी निवड
पुतिन म्हणाले की, म्हणून ‘वॅगनर’ बंडखोरांना सोडले
काही दिवसांपूर्वी दर्शना पवार या तरुणीची पुण्यात हत्या झाली होती. लग्नाला नकार देत असल्यामुळे तिच्या मित्राने तिची हत्या केली आणि तो पळून गेला होता. काही दिवस तो पोलिसांना हुलकावणी देत होता अखेर पोलिसांनी त्याला पकडले. त्याने ब्लेड आणि दगडाने दर्शना पवारला मारल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
लेशपाल जवळगे हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या आढेगावचा आहे. तो पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करते. त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं त्यानंतर एक वर्ष नोकरी केली आणि आता तो 2018 पासून पुण्यात MPSC चा अभ्यास करत आहे. त्याचे आई-वडिल आढेगावात शेती करतात.