दिल्लीत काल किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने दोन वर्षातील सर्वात थंड दिवस दिल्लीकरांना अनुभवायला मिळाला.
गोठवणारे वारे आणि धुक्याच्या मागे लपलेल्या सूर्यासह दिल्लीकरांना हाड गोठवणारी थंडी सहन करावी लागली. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्लीसाठी दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
सफदरजंग येथे कमाल तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी कमी होते. तर शहरातील अनेक भागांना कडाक्याची थंडी सहन करावी लागली आहे. यामध्ये नरेला, जाफरपूर, पालम, रिज आणि आयानगर इथे १५ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. या परिसरात हलके वारेही वाहत होते.
पालम, सफदरजंग येथे पहाटे १.३० ते ३.३० दरम्यान दाट धुके पसरले होते. हवामान खात्याने दोन दिवस सकाळी मध्यम धुके राहण्याची शक्यता वर्तवली असून अनेक ठिकाणी थंडीच्या दिवसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
मॉलमध्ये पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर…
सुनील गावस्कर म्हणतात, ऋषभ पंत कसोटी कर्णधार म्हणून योग्य!
किरण मानेचे मालिका निर्मात्यांवर नवे आरोप!
जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेची वर्षपूर्ती
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शहरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे १४ आणि ६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. काल सफदरजंग येथे किमान तापमान ६ अंश सेल्सिअस होते. जे सामान्य तापमानापेक्षा एक अंश कमी होते. २१ जानेवारी रोजी शहरात हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, दिल्लीत हवेची श्रेणी दोन दिवसात सुधारली आहे.